Suryakanta Patil News : चव्हाणांचा भाजप प्रवेश, गोपछडेंना खासदारकी; नाराज सूर्यकांता पाटील वेगळी वाट धरणार?

Nanded BJP Politics : सूर्यकांता पाटील या 2014 ला भाजपमध्ये आल्या होत्या. ज्यांना वर्षानुवर्षे विरोध केला तेच अशोक चव्हाण आता भाजपवासी झाल्याने पाटील यांची मोठी कोंडी झाली आहे.
Suryakanta Patil- Ashok Chavan
Suryakanta Patil- Ashok Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Nanded Politics : माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील या स्पष्ट वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्याच सरकारला यापूर्वी अनेकदा खडे बोल सुनावतानाही कधी मागेपुढे पाहिलेले नाही. त्यांनी कल्की आवताराचा पुतळा उभारणे, वकिलांनी केलेले आंदोलन, दिल्लीच्या सीमेवर होणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवर केंद्रीय नेतृत्वावर परखड टीका करून घरचा आहेर दिला आहे, पण याच पाटील आता तब्बल दहा वर्षांच्या भाजपसोबतच्या वाटचालीनंतर आता अस्वस्थतेच्या गर्तेत अडकल्या की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आत्ता भाजप असा राजकीय प्रवास राहिला आहे. भाजप नेतृत्वावर केलेल्या परखड टीकेमुळे त्या कायम चर्चेत असतात. भारतीय जनता पक्षात येऊन पाटील यांना बरीच वर्षे झाली आहेत. त्यांना पक्षाने अद्याप काहीच दिलेले नाही, पण याचवेळी भाजप (BJP) प्रवेश केल्यानंतर 24 तासांच्या आतच अशोक चव्हाण यांना खासदारकीही देऊन टाकली. तसेच पाटील यांच्यासाठी आणखी एक मोठा धक्का म्हणजे अजित गोपछडे यांना थेट राज्यसभेचं बक्षीस दिले.

Suryakanta Patil- Ashok Chavan
Budget Session Maharashtra : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आरक्षण मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

अचानकपणे गोपछडे यांंचे नाव पुढे आणल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यात पाटील याही अपवाद नसणार. चव्हाण आणि गोपछडे अशा नांदेडमधील दोघांना खासदारकी बहाल करतानाच भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा पाटील यांच्याकडे पक्षाने कानाडोळा केला. हेच त्यांच्या नाराजीचे मूळ कारण आहे.

सूर्यकांता पाटील या 2014 ला भाजपमध्ये आल्या होत्या.ज्यांना वर्षानुवर्षे विरोध केला तेच अशोक चव्हाण (Ashok Chavan) आता भाजपवासी झाल्याने पाटील यांची मोठी कोंडी झाली आहे.

त्यात पाटलांचा अपवाद कसा असेल. त्यामुळे त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारवर अशीच टीका केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या मुद्द्यावर सूर्यकांता पाटील केंद्रीय नेतृत्वावर टीका करताना म्हणाल्या, लोकांच्या मनात काय आहे हे ओळखून राजकीय नेत्यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे. ज्या नेत्यांना देशातील शेतकऱ्यांची, नागरिकांची अस्वस्थता दिसत नाही, असा नेता देशाला अंधारात नेतो. तसेच या देशात शेतकऱ्यांना कोणी घाबरत नाही. शेतकरी एकत्र येऊन मोर्चा काढू ‌‌‌‌‌शकत नाहीत म्हणून त्यांना कोणी भीत नाही, अशी परखड टीका केंद्रीय नेतृत्वावर केली.

कल्की अवताराचा पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावर ही सूर्यकांता पाटील यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, अजून कलियुग संपलेले नाही. कल्की अवतार येण्यासाठी चार लाख वर्षे बाकी आहेत. तरीदेखील पुतळा उभारण्यात येत आहे, अशी टीका करून केंद्र सरकारलाच एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे. अशा एकापाठोपाठ टीकेच्या तोफ डागल्यामुळे सूर्यकांता पाटील त्यामुळे त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारवरही अशीच टीका केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Suryakanta Patil- Ashok Chavan
Basavraj Patil News : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; मराठवाड्यातील बड्या नेत्याचा राजीनामा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com