Prakash shendge. Chhagan Bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Prakash shendge: तुम्ही एका भुजबळांना पाडले तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू; शेंडगेंनी वात पेटवली...

Maratha Vs OBC: भुजबळ यांच्या मतदारसंघात फक्त मराठा मतदार नाहीत, सर्वच जाती धर्माचे लोक आहेत.

Mangesh Mahale

Nanded:राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यांवरून दोन्ही समाजातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे मराठा समाजातील व्यक्तींच्या नोदी तपासून त्यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

ओबीसी समाजाची भूमिका घेणारे अजित पवार गटातील नेते, मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजाने मतदान करू नये, असे आवाहन केले जात आहे. त्याला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी इशारा दिला आहे. "महाराष्ट्रात ओबीसीची संख्या 60 टक्के आहे. तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू," असा इशारा शेंडगे यांनी दिला. ते नांदेडमध्ये बोलत होते.

भुजबळांनाच का टार्गेट केलं जातंय...

"छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात फक्त मराठा मतदार नाहीत सर्वच जाती धर्माचे लोक आहेत. तरीही त्यांना टार्गेट केल जाते, पण ओबीसी समाज 160 मतदारसंघात आहे. तुम्ही भुजबळ यांना पाडलं तर सर्व ओबीसी समाज 160 मतदारसंघात मराठा आमदारांना पाडल्या शिवाय राहणार नाही," असा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समता परिषद आक्रमक...

उद्या (शुक्रवार) जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीडच्या गेवराई तालुक्यातील बऱ्हाणपूर गावांमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या ठिकाणी लावलेले बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडले आहेत. या विरोधात आता समता परिषद आक्रमक झाली आहे.

गेवराई पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

या प्रकरणी समता परिषदेच्या वतीने प्रल्हाद यादव यांनी गेवराई पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गेवराई पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅनर्स फाडल्यामुळे ओबीसींनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT