Solapur : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाठीभेटीवर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. "अजित पवार आणि शरद पवार यांच्या गाठीभेटी होत असल्या तरी मागचे मतभेद तसेच आहेत," "दोन्ही पवारांच्या मनात काय चाललंय हे घटना घडल्याशिवाय कळत नाही," असा टोला चंद्रकांतदादांना लगावला आहे.
त्यावर आज शरद पवार यांना विचारले असते, त्यांनी सूचक विधान केले आहे. शरद पवारांच्या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार आज माढ्यात शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले आहे.
"पवार कुटुंबीय एकत्र का येतात, हे आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक निकालानंतरच कळेल," असं सूचक विधान शरद पवारांनी केले आहे. चंद्रकांत पाटलांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य केले होते. त्यावर शरद पवारांनी उत्तर दिले.
"पवारांचे कुटुंब सण, लग्न असेल तर एकत्र येतात, पण शरद पवार आणि अजित पवार यांच्या डोक्यात काय चाललंय हे घटना घडल्याशिवाय कळत नाही," अशा शब्दांत चंद्रकांतदादांनी साहेब, दादांच्या भेटीवर टोला मारला आहे.
काल (मंगळवारी) पाडव्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या बारामतीतील गोविंदबाग परिसरातच अजितदादा होते, पण दुपारपर्यंत हे गोविंदबागेकडे फिरकलेच नाहीत. मात्र, रात्री पाडव्याच्या कार्यक्रमात अजितदादांनी आपली उपस्थिती दर्शवली. खासदार सुप्रिया सुळेंनी हा फोटोही पोस्ट केला आहे.
हिवाळी अधिवेशनानंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आलेले दिसतील, असे विधान अजित पवार गटातील नेते, मंत्री अनिल पाटील यांनी नुकतेच केलं आहे. अनिल पाटलांच्या विधानाचा शरद पवारांनी समाचार घेत त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"मी नुकताच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आहे. मतदारसंघातील लोकांशी मी बोललो तेव्हा तेथील लोकांनी सांगितले की अनिल पाटील हे पुन्हा निवडून येणार नाहीत," असे शरद पवार म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांच्या दाव्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.
दिवाळीनिमित्त गोविंदबागेत पवार कुटुंबींयांनी एकत्र दिवाळी साजरी केली. अजित पवार हे पण उपस्थित होते. अजितदादा उपस्थिती राहणार की नाही, याबाबत चर्चा होती. "सत्तर वर्षांच्या परंपरेनुसार आम्ही दिवाळीला एकत्र येतो. दिवाळी सण हा आनंदाचा असतो. आनंदाच्या दिवसांमध्ये पवार कुटुंबीय एकत्र येत असते. आमची ही परंपरा गेल्या 70 वर्षांपासून सुरू आहे. आम्ही पवार कुटुंबीय कोणतेही राजकीय लवलेश न ठेवता कुटुंब म्हणून आम्ही एकत्र येत असतो. ही परंपरा ही आम्ही सर्वांनी कायम ठेवली आहे. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्याला कोणताही राजकीय लवलेशदेखील नव्हता. आम्ही पवार कुटुंबीय दरवर्षी एकत्रित येतो," असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी अजित पवारांच्या भेटीवर दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.