Shyamsundar Shinde, Aasha shinde, Pratap Chikhlikar Sarakrnama
मराठवाडा

Pratap Chikhlikar News : चिखलीकर बहीण-भावामध्ये शाब्दिक चकमकी; लोहा- कंधारमधील कार्यक्रमावरून एकमेकांवर टीका

Sachin Waghmare

Nanded News : नांदेड लोकसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागल्याने येत्या काळात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आता बॅकफूटवर यावे लागणार आहे. त्यातच चिखलीकर यांचे लक्ष पूर्वीच्या त्यांच्या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे याठिकाणी भविष्यात बहीण विरुद्ध भाऊ असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दोघांत शाब्दिक युद्ध रंगले आहे.

लोहा-कंधार मतदारसंघातील आमदार शामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या पत्नी आशा शिंदे या भाजपाचे (Bjp) माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आहेत. शनिवारी आशा शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळेच आशा शिंदे व चिखलीकर यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. (Pratap Chikhlikar News)

दोन दिवसापूर्वी खासदार चिखलीकर (Pratap Chikhlikar) यांनी या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी काम सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. मी या निवडणुकीत जिंकलो तरी व पडलो तरी तुमच्यासोबत आहे. पण त्यांचे दुकान साडेचार वर्षासाठी आहे. पडल्यावर ते तुम्हाला दिसणारही नाहीत, माझे काम सुरूच आहे. गेल्या 35 वर्षांपासून काम करतो आहे. युवकांना वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहेत. नोकरी देण्याची आश्वासन दिले जात आहेत. पण ज्या भावाचे उपकार आहेत. त्याची जाणीव ठेवत नसल्याची टीका माजी खासदार चिखलीकर यांनी नाव न घेता केली होती.

त्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर आशा शिंदे यांनी दिले आहे. कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने मी निवडणुकीला उभी राहणार आहे. मी विधानसभेची निवडणूक लढवणार असून आम्ही समाजसेवा करतो. आम्ही दुकान लावले नाहीत, दुकान त्यांनी लावले आहेत, अशा शब्दांत आशा शिंदे यांनी भाऊ चिखलीकर यांच्यावर सडकून टीका केली.

दुसरीकडे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी चिखलीकर यांचे नाव न घेता बेईमान म्हणून उल्लेख केला. आशा शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. या मतदारसंघात आम्ही खूप काम केले आहे, त्यामुळे एकही तक्रार येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार

आम्ही कोणाचे पैसे लुबाडत नाहीत, याला अटक करा त्याला अटक करा निगेटिव काम करत नाही. ज्यांना आम्ही खूप मोठे केले आहे, त्यांचा या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशाराही यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी चिखलीकर यांचे नाव न घेता दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT