Ajit Pawar-Pratap Patil Chikhlikar- Udya Chavan News Sarkarnama
मराठवाडा

Pratap Patil Chikhlikar News : अशोक चव्हाण यांच्या मेहुण्यानंतर आता पुतण्याही राष्ट्रवादीच्या गळाला! चिखलीकर दुसरा धक्का देणार..

BJP leader Pratap Patil Chikhlikar is set to deliver another political blow to Ashok Chavan in Nanded by reportedly planning to bring Chavan’s nephew into the NCP. : स्वत: उदय चव्हाण यांनी याबाबत काहीही भाष्य केलेले नसले, तरी प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाची शक्यता वर्तवल्याची चर्चा आहे.

Jagdish Pansare

Nanded Political News : नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरूच आहेत. सध्याच्या घडीला चिखलीकर हे चव्हाण यांना भारी ठरले, असेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादीकडून लोहा-कंधार मतदारसंघातून पून्हा आमदार झालेल्या चिखलीकर यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला नंबर एकचा पक्ष बनवण्याचा विडा उचलला आहे.

कट्टर राजकीय विरोधक अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर आता चव्हाण यांचे पुतणे उदय चव्हाण यांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उदय चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्यासह शनिवारी मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली आहे. येत्या 11 मे रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्यातील तिसरा भव्य प्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी उदय चव्हाण यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हा प्रवेश झाला तर प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना हा दुसरा धक्का समजला जाईल. अशोक चव्हाण यांचे पुतणे नरेंद्र चव्हाण यांची नुकतीच भाऊसाहेब चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाली. तर दुसरे पुतणे उदय चव्हाण यांनी आपले जुने स्नेही असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत मुंबईत अजित पवारांची भेट घेऊन आपल्या पुढील राजकीय वाटचालीचे संकेत दिले आहेत. काही वर्ष नगरसेवक राहिलेल्या उदय चव्हाण यांनी आता सक्रीय राजकारणात परतण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

स्वत: उदय चव्हाण यांनी याबाबत काहीही भाष्य केलेले नसले, तरी प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाची शक्यता वर्तवल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या चार माजी आमदारांना राष्ट्रवादीत प्रवेश देत चिखलीकर यांनी आधीच अशोक चव्हाण यांची कोंडी केली आहे. आता पुतण्याला पक्षात घेत चिखलीकर त्यांना दुसरा धक्का देऊ पाहत आहेत. याआधी मोहन हंबर्डे, ओमप्रकाश पोकर्णा, भास्कर पाटील खतगावकर, मीनल खतगावकर यांनी अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अजित पवार यांना पक्षप्रवेश सोहळ्यांसाठी नांदेडमध्ये वारंवार यावे लागेल, असा दावा चिखलीकर यांनी खतगावकर यांच्या प्रवेश सोहळ्यातील भाषणात केला होता. त्यानूसार येत्या 11 मे रोजी मुखेड तालुक्यात तिसऱ्या मोठ्या प्रवेश सोहळ्याची तयारी चिखलीकर यांच्याकडून सुरु आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषदांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी चिखलीकर यांनी कंबर कसली आहे. तर अजित पवार यांनीही जिल्ह्यातील सगळी सूत्रं प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हाती सोपवली आहेत.

चिखलीकर यांना ताकद देत अजित पवार यांनी अशोक चव्हाण यांचे जिल्ह्यातील वर्चस्व कमी करण्याची खेळी केली आहे. राष्ट्रवादीकडे प्रवेशासाठी वाढता ओढा पाहता चिखलीकर यांच्या माध्यमातून त्यांची खेळी यशस्वी होताना दिसते आहे. उदय चव्हाण यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाला किती फायदा होईल, हे आज सांगता येत नसले तरी अशोक चव्हाण यांचे मात्र राजकीय नुकसान होणार, एवढे मात्र निश्चित. उदय चव्हाण हे 1980 पासून अशोक चव्हाण यांच्यासोबत कार्यरत आहेत. दरम्यान, 1990 च्या काळात त्यांनी भाजपामध्येही प्रवेश केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT