Eknath Shinde  Sarkarnama
मराठवाडा

Shiv Sena Entry : परभणीत मोठी राजकीय उलथापालथ; अजितदादांनी निवडणुकीची जबाबदारी दिलेल्या नेत्याने राष्ट्रवादी सोडली, धनुष्यबाण हाती घेण्याचे थेट कारणच सांगितले

Maharashtra Politic News : परभणीत शिवसेनेच्या वतीने शेतकरी व युवकांसाठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

Jagdish Pansare

Parbhani Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकीय प्रवासाला दिवंगत नेते अजित पवारांमुळे सुरूवात केली होती. आता माझे ते पालकच हरवल्याने या प्रवासाला पूर्णविराम देत आहे. माझी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा या पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर कुठलीही नाराजी नाही, असे स्पष्ट करत शिवसेनेतून नव्या राजकीय पर्वाला सुरूवात करत असल्याचे माजी महापौर प्रताप देशमुख यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 30 रोजी देशमुख धनुष्यबाण हाती घेणार आहेत. हे पक्षांतर आपण आपला राजकीय पालक हरवल्यामुळे करत आहोत, आपली कोणाबद्दलही तक्रार, नाराजी नाही, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी व चार माजी नगरसेवकही त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

परभणीत शिवसेनेच्या वतीने 30 ऑगस्टला शेतकरी व युवकांसाठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी खासदार संजय जाधव व माजी महापौर प्रताप देशमुख यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

माझे आतापर्यंतचे संपूर्ण राजकीय जीवन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. पक्षावर माझी कोणतीही नाराजी नाही. मात्र, अजितदादांच्या निधनानंतर आमचा पालकच हरवला. अजितदादा हेच आमच्यासाठी पक्ष होते असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय जीवनाला पूर्णविराम देऊन नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

तेच नाहीत, तर उर्वरित राजकीय गोष्टींनाही पूर्णविराम देऊन नवीन राजकीय सुरुवात करावी, असा निश्चय केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहोत, असेही देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, या प्रवेशामुळे परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असून, चार माजी नगरसेवकांचाही या प्रवेश सोहळ्यात समावेश असणार आहे. ३० ऑगस्टच्या महामेळाव्याच्या निमित्ताने हा पक्षप्रवेश होणार असल्याने परभणीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. देशमुख यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात धक्का बसण्याची शक्यता असून, शिवसेनेला मात्र आगामी राजकीय वाटचालीसाठी बळ मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील अनेक पक्षातील मात्तबर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT