Ajit Pawar-Pratap Patil Chikhlikar News Sarkarnama
मराठवाडा

MLA Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांना हवे मंत्रीपदाचे गिफ्ट! अजित पवार शब्दाचे पक्के म्हणत इच्छा व्यक्त ...

At his birthday celebration event, MLA Pratap Patil Chikhlikar openly expressed his desire for a ministerial position : वाढदिवसानिमित्त आपल्या गळ्यात जितके हार पडले त्या प्रत्येक हारासोबत आता तुम्ही मंत्री झालं पाहिजेत अशा अनेकांच्या शुभेच्छा होत्या.

Jagdish Pansare

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस मतदार संघात आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून पराभूत झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उडी घेतली. लोहा- कंधार मतदार संघातून उमेदवारी मिळवत विजयही मिळवला.

अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलेल्या संधीचं सोन करत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यात नंबर एकचा करण्यासाठी चिखलीकरांनी कंबर कसली आहे. मोठ्या प्रमाणात काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. आतापर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने तीनवेळा नांदेड मध्ये येऊन गेले.

अजूनही राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरूच आहे. काँग्रेसमधून चार माजी आमदारांना राष्ट्रवादीत आणत प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी अजित पवारांना इंम्प्रेस केले. चिखलीकर यांच्या कामाचा हा झपाटा पाहून अजित पवार भारावून गेले आणि त्यांनी नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा पूर्णपणे त्यांच्या खांद्यावर सोपवली. वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात प्रताप पाटील चिखलीकर यांनी राजकारणातील आपल्या सिनियारिटीचा दाखला देत मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली.

वाढदिवसानिमित्त आपल्या गळ्यात जितके हार पडले त्या प्रत्येक हारासोबत आता तुम्ही मंत्री झालं पाहिजेत अशा अनेकांच्या शुभेच्छा होत्या. परंतु माझे राजकारण हे विविध पक्षातून झाल्यामुळे प्रत्येक पक्षात निवडून आल्यानंतर 'तुम्ही नवे आहात, थोडं थांबा' असं मला सांगितलं गेलं. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्याशी चर्चा करत असताना मी त्यांना हा अनुभव सांगितला. तेव्हा मी तुमची 2004 पासून ची सिनियारिटी गृहीत धरील,असा शब्द त्यांनी मला दिला.

अजितदादा हे शब्दाला जागणारे नेते आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या जे मनात आहे ते परमेश्वर लवकरच पूर्ण करेल, असे म्हणत प्रताप पाटील चिखलीकर यांनी मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. विधानसभेच्या आतापर्यंत लढलेल्या निवडणुकीत पहिल्यांदा आपण शिलाई मशीन या चिन्हावर निवडून आलो. त्यानंतर शिवसेनेकडून नंतर भाजपकडून आणि आता राष्ट्रवादीकडून. त्यामुळे ज्या पक्षात मी गेलो त्या पक्षात ती माझी पहिली टर्म ठरली. याचा मला बराच फटका बसला, मात्र अजितदादांनी मला शब्द दिला आहे आणि ते शब्दाचे पक्के असल्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनातील इच्छा ही लवकर पूर्ण होईल, असेही चिखलीकर म्हणाले.

अजित पवार यांनी बारामतीचा केलेला विकास आणि नांदेड जिल्ह्याची दुरावस्था यावर भाष्य करताना प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याची वाट लावली, असा टोला अप्रत्यक्षपणे लगावला. एकूणच प्रताप पाटील चिखलीकर यांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अजित पवार यांच्याकडून मंत्रिपद हवे असल्याची चर्चा त्यांच्या या विधानानंतर नांदेड जिल्ह्यात होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT