Pritam Munde Pankaja Munde sarkarnama
मराठवाडा

Pritam Munde News : पक्षाने उमेदवारी टाळली असली तरी खासदार डॉ. मुंडेंनी अर्ज घेतला

Loksabha Election News : दरम्यान, उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही अर्ज दाखल झाला नसला तरी 39 लोकांनी 92 उमेदवारी अर्ज घेतले आहेत

Datta Deshmukh

Beed News : भाजपने सलग दोन वेळा खासदार राहीलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी टाळून पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनीही अर्ज घेतल्याची नोंद निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाली आहे.

बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची अधिसुचना गुरुवारी (ता. 18) प्रसिद्ध होऊन उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला तरी 39 लोकांनी 92 उमेदवारी अर्ज घेतले. यात खासदार डॉ. प्रितम मुंडे, भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी 25 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र वाटप सुरू असेल. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावयाचे आहेत.

दरम्यान, भाजपने सलग दोनवेळा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी टाळून पंकजा मुंडे Pankaja Munde यांना उमेदवारी दिली. त्यांचा महिनाभरापासून प्रचार सुरु आहे. त्यांच्या साथीला डॉ. प्रीतम मुंडे देखील प्रचार करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने बजरंग सोनवणे Bajrang Sonwane यांना उमेदवारी दिली आहे. सध्या प्रचार रंगतदार स्थितीत आहे. दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरु आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही अर्ज दाखल झाला नसला तरी 39 लोकांनी 92 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यात खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनीही अर्ज घेतला आहे. यासह भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे व त्यांच्या पत्नी सारिका सोनवणे, तसेच वंचितचे अशोक हिंगे यांनीही अर्ज घेतला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT