Bajrang Sonwane News : ...अन् प्रचाराच्या धावपळीतही बजरंग सोनवणेंचा ताफा पोहाेचला थेट रुग्णालयात!

Beed Loksabha Election 2024 : या निवडणुकीत भाजपने दोन वेळा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी टाळून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरविले आहे.
Bajrang Sonwane
Bajrang SonwaneSarkarnama
Published on
Updated on

Beed News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. बीडची लोकसभेची निवडणूक हाय होल्टेज आहे. भाजपकडून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) रिंगणात आहेत. दोन्ही बाजूंनी प्रचाराचा जोर सुरू आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे आपला ताफा घेऊन थेट रुग्णालयात पोहाेचले.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जात त्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेत संवाद साधला. माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, शिवसेनेचे केज विधानसभा प्रमुख मदन परदेशी, तानाजी लांडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य पिंटू ठोंबरे, सुधाकर शिंदे, व्यंकटेश चामनर, नगरसेवक भाऊसाहेब गुंड, भावा लोमटे, बालासाहेब जाधव आदी सोबत होते.

Bajrang Sonwane
Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंचं खटक्यावर बोट; 'दहा वर्षांत निष्क्रीय ठरल्यानेच प्रीतम मुंडेंचा पत्ता कट'

या निवडणुकीत भाजपने दोन वेळा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी टाळून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना रिंगणात उतरविले आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी मंत्री, खासदार, आमदारांची फौज मैदानात आहे, तर बजरंग सोनवणे यांनीही प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. असाच अंबाजोगाई शहरात प्रचार करत असताना बजरंग सोनवणे यांनी आपला ताफा स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात वळविला. रुग्णालयातील वार्डात जाऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. डॉक्टरांसोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धनंजय मुंडेंची अशीही बांधिलकी...

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. भाजपकडून पंकजा मुंडे रिंगणात आहेत. पालकमंत्री आणि तसेच बहीण अशी पंकजा मुंडे यांना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी धनंजय मुंडेंच्या खांद्यावर आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे प्रचाराला ब्रेक देत अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतात पोचले.

धारुर तालुक्यातील डाळिंब, आंबा, मिरची, टोमॅटो आदी पिकांच्या अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची धनंजय मुंडेंनी पाहणी करून नुकसान पंचनाम्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. धनंजय मुंडेंनी चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन शेतातील रब्बी पिके, फळपिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या समवेत रमेश आडसकर, जयसिंह सोळंके, माधव निर्मळ, हारुण इनामदार, राम कुलकर्णी, महादेव शिनगारे, नितीन शिनगारे, महादेव तोंडे, हनुमंत नागरगोजे, सुदाम बडे, प्रताप चव्हाण, आदी उपस्थित होते. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. गुरुवारी धारुर, वडवणी, गेवराई, केज व अंबाजोगाई तालुक्यात जोराचा पाऊस झाला. एक हजार हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Bajrang Sonwane
Devendra Fadnavis News: उद्धव ठाकरेंची टीका भाजपच्या जिव्हारी, फडणवीसांचंही जशास तसं प्रत्युत्तर ; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com