Internal rift between Nilesh Lanke and Rohit Pawar Sarkarnama
मराठवाडा

NCP Internal Politics : 'अनसिक्युअर कोण?' नीलेश लंकेंच्या एका वाक्यानं राष्ट्रवादीत संशयाचं वादळ!

Ahilyanagar MP Nilesh Lanke Big Claim on NCP Merger After Ajit Pawar Death: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी केलेल्या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

NCP political merger: अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावरून राजकारण पेटलं आहे. यावर अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळे खुलासे होत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून संयमाची भूमिका बाळगली जात आहे.

यावर आता अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी धाराशिव इथं मोठा दावा केला. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामुळे अजित पवार राष्ट्रवादीमधील कोणीतरी अनसिक्युअर होणार होतं, त्यांचे राजकारण असुरक्षित होणार होतं, असा हा दावा करत नीलेश लंके यांनी कोणाचेही नाव न घेतले नाही. यामुळे खळबळ उडाली आहे.

खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले, "पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आम्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे सामोरे गेलो. दोन्ही राष्ट्रवादीमधील उमेदवारांना निवडणुकीमध्ये त्यांना चॉईस चिन्ह दिलं गेलं. उमेदवाराला तुतारी किंवा घड्याळ, असे चॉईसने चिन्ह दिलं होतं. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अजितदादा बरोबर प्रचारात सक्रिय होतो.

मी स्वतः, सुनील टिंगरे, रोहित पवार, सुनील शेळके आणि ताई (खासदार सुप्रिया सुळे) आम्ही एकत्रित प्रचार केला." आताच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना त्यांच्या चॉईसनुसारच बऱ्याच ठिकाणी चिन्ह दिलं आहे. कुणाला तुतारी पाहिजे, कुणाला घड्याळ पाहिजे, असं नियोजन करून चिन्ह वाटप केले होते. याचा अर्थ वरिष्ठ पातळीवर बऱ्याच काही गोष्टी घडल्या होत्या, असे नीलेश लंके यांनी म्हटले.

'सातारा भागामध्ये काल प्रचाराला होतो, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर तिथं काम करताना, आम्ही बरेच उमेदवार घड्याळ चिन्हावर दिले आहेत. खेड इथं देखील प्रचाराला होतो, तिथं देखील उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उभे होते.

शिरूर इथलं उदाहरण देताना, अशोकबापू पवार हे विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून उभे होते. परंतु त्यांच्या पत्नी सुजाताभाभी आता घड्याळ पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. याचा अर्थ असा आहे की, वरिष्ठ लेव्हला बऱ्यापैकी गोष्टी ठरल्या होत्या,' असा दावा नीलेश लंके यांनी केला आहे.

'राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे मुख्य भूमिका पार पाडत होते ते, अजित दादा! आता दादा आपल्यात नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. दादा बोललेच नव्हते, या गोष्टी केल्याच नाहीत, आमच्यासमोर चर्चा झाल्याच नाहीत, अशा चर्चांना आता उधान आणलं जात आहे,' नीलेश लंके यांनी सांगितले.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे, यामागे पक्षातील काही लोकांचा स्वार्थ दिसतो आहे का? यावर बोलताना नीलेश लंके म्हणाले, "प्रत्येकाचे राजकीय आराखडे वेगवेगळ्या असतात. पक्षाचे देखील राजकीय आराखडे असतात, राजकीय डावपेच असतात, राजकारणामध्ये नेतृत्व करणारे काही लोक 'अनसिक्युअर' असतात, आपण सुरक्षित राहू शकतो की नाही, आपण सुरक्षित राहण्यासाठी काय केलं पाहिजे, असे सुद्धा डावपेच असू शकतात."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT