

Konkan News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे तडफदार नेते रामदास कदम हे त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. त्यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचे नेतेमंडळी हे कायम असल्याचं वारंवार पाहायला मिळालं आहे.त्यांच्यात आणि भास्कर जाधव यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. पण आता भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर गंभीर आरोप करत कोकणचं राजकारणच तापवलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय वातावरण जिल्हा परिषद निवडणुकीमुळे पेटल्याचं दिसून येत आहे. त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधवांनी शिवसेना माजी मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार व नेते भास्कर जाधव यांची जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी खेड येथे सभा झाली. या सभेत त्यांनी रामदास कदमांवर जोरदार टीका केली. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप करताना त्यांच्यामुळे सख्या भावाच्या घरात दिवाळीचा दिवा लागला नसल्याचं म्हटलं.
तसेच कदमने सख्ख्या भावाला जेलमध्ये टाकलं होतं. रामदास कदम यांची पापं एवढी मोठी आहेत की, त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागणार असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
रामदास कदम यांना आपण एकेरीच बोलणार असल्याचा उच्चारही भास्कर जाधव यांनी यावेळी केला. माझा मुलगा कष्ट करून मोठा झाला आहे. तुम्ही हप्तेखोर, हप्ते खाता, अशी सडकून टीकाही जाधव यांनी केली. रामदास कदम हा माणूस आहे की कोण हेच कळत नाही. रामदास कदम ही विकृती असल्याचा घणाघातही जाधव यांनी केला.
भास्कर जाधव म्हणाले, रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदास कुठेही गेले तरी दुसऱ्याच्या नावाने शिव्या देतो. गाढवाला गुळाची चव काय? अशी रामदास कदमांची स्थिती आहे, रामदास कदम यांनी चांगली चरित्र वाचावी असा खोचक सल्लाही जाधव यांनी रामदास कदम यांना दिला या खेडामधील सभेत दिला आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दीवर्ष असून आज त्यांची १००वी जयंती आहे. पण आयुष्यभर ज्या मुंबईत राहुल बाळासाहेबांच्या शिवसेनेनं राजकारण केलं त्याच मुंबईच्या महापालिकेत पहिल्यांदाच शिवसेनाचा महापौर होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मांडली.
एकनाथ शिंदेंना मी आव्हान वजा विनंती करतो की, तुम्ही भाजपला सांगितलं पाहिजे की केंद्रात आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आम्ही तुमच्यासोबत राहू. राज्यात आम्ही तुमच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे तर तुमच्यासोबत राहू. पण हे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दीवर्ष आहे. म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवेसेनेचाच झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.