Market Committee News Sarkarnama
मराठवाडा

Paithan News : बाजार समितीच्या निवडणुकीत राडा; भाषण सुरू असतानाच काँग्रेस नेत्याच्या कानाखाली लगावली

Market Committee News : पैठण बाजार समितीच्या निवडणुकीत गटबाजी उफाळून आल्याचं समोर आलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhaji Nagar : राज्यात सध्या बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 28 एप्रिलला मतदान पार पडणार आहे.

या मतदानापूर्वीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एका उमेदवाराला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

पैठण बाजार समितीच्या निवडणुकीत गटबाजी उफाळून आल्याचं समोर आलं आहे. यात काही जणांनी राडा घातल्यामुळे एक जण जखमी झाला आहे. भाषण सुरू असतानाच एकाने दुसऱ्याच्या कानशिलात लगावली असल्याचं व्हिडिओत दिसत असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

पैठण बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गटात वाद उफाळून आल्याची घटना समोर आली आहे. पैठण येथील एका गावात प्रचारासाठी गेलेल्या उमेदवाराला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

बाबासाहेब पवार, निवृत्ती पोकळे हे निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पैठणच्या इंदेगावमध्ये गेले होते. यावेळी भाषण सुरू असतानाच एकजण अंगावर धावून जात काँग्रेस नेत्याच्या कानशिलात लगावली असल्याचं व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. ज्यांच्यावर हा हल्ला झाला त्यांनी पैठण पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे.

(Ediited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT