Loksabha Election Survey : देशात आज निवडणुका झाल्या तर कोण मारणार बाजी? भाजप की काँग्रेस! सर्वेक्षणातून झाले स्पष्ट

Loksabha Election : सर्वेक्षणात 90 हजार लोकांनी सहभाग घेतला
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Survey for Loksabha Election : सध्या राज्यासह देशाभरात लोकसभा निवडणुकीचा 'फिव्हर' असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष आमच्या पक्षाला जनाधार आहे. तसेच आता निवडणुका घेतल्या तर आम्हीच निवडून येऊ, असा दावा करताना दिसत आहेत. मात्र खरेच आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला यश मिळणार? भाजप की काँग्रेस की विरोधकांच्या आघाडीला? या प्रश्नाचे उत्तर एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

Rahul Gandhi, Narendra Modi
Devendra Fadnavis News : आव्हाडांच्या वक्तव्याचा अर्थ काय? तुम्हाला दंगली घडवायच्यात का? ; फडणवीसांचा सवाल!

आता लोकसभेची निवडणूक झाली तर कुणाला बहुमत मिळेल याबाबत टाइम्स नाऊ, नवभारत आणि ईटीजी रिसर्च या संस्थांनी सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात देशभरातून 90 हजार लोकांनी सहभाग घेतला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा जिंकणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, यापूर्वी झालेल्या सी व्होटर्सच्या सर्वेक्षणातून राज्यात विरोधकांना मोठे यश मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

Rahul Gandhi, Narendra Modi
Maratha reservation : शिंदे- फडणवीस सरकारच मराठा समाजाला न्याय देईल!

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) सरकारला विरोधकांच्या युतीचा काहीही फरक पडणार नाही. देशात आता निवडणुका झाल्या तर पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा स्पष्ट संदेश या सर्वेक्षणात सहभागी लोकांनी दिला आहे. देशातील 51 टक्के लोक मोदी सरकारच्या कामावर समाधानी असल्याची माहिती या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. दरम्यान, या सर्वेक्षणात कुणाला किती जागा मिळणार हे स्पष्ट करण्यात आले आहे.

Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi Vacates Bungalow: सरकारी बंगला सोडल्यानंतर राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसची विशेष मोहीम 'मेरा घर आपका घर'

या सर्वेक्षनानुसार, आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजप आघाडीला (NDA) २९२ ते ३३८ जागा, काँग्रेस आघाडीला (UPA) १०६ ते १४४ जागा, तर 'टीएमसी' आघाडीला २० ते २२ जागा मिळतील तर 'वायएसआरपी'च्या खात्यात २४ ते २५ जागा, बीजेडीला ११ ते १३ आणि इतरांच्या खात्यात ५० ते ८० जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, सर्वेक्षणानुसार दिल्लीत काँग्रेस नेस्तनाबूत होणार आहे. आगामी निवडणुकीत (Delhi) दिल्लीतील एकूण 7 जागांपैकी भाजपला 4 आणि आम आदमी पक्षाला 3 जागा मिळतील.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com