Radhakrishna Vikhe On Manoj Jarange
Radhakrishna Vikhe On Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Radhakrishna Vikhe On Maratha Reservation : आम्हीही मराठा समाजासाठी काम करतोच; राधाकृष्ण विखे पाटील झाले आक्रमक...

Jagdish Pansare

Nanded News : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी आलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर भाष्य करतानाच मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली. मराठा समाजाचे आंदोलन भरकटत चालले असून त्याचे गांभीर्य कमी होत आहे. आम्हीही आमच्या पातळीवर मराठा समाजासाठी काम करतोच, असे म्हणत विखे-पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली.

आमच्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. सभागृहात याबाबत निर्णय झाला आहे. परंतु, विरोधीपक्ष अजूनही आरक्षणाबाबत विरोधी भूमिका मांडत आहे. मराठा समाजासाठी (Maratha Reservtion) काम करणारे भरपूर लोक आहेत. आम्ही सुध्दा ग्राउंड लेव्हलवर काम करतो. त्यामुळे जरांगे यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे, याची मला आवश्यकता वाटत नाही, असेही विखे पाटील (Radhakrishna Vikhe) माध्यमांशी बोलताना म्हणाले. (Radhakrishna Vikhe On Maratha Reservation News)

भाजपने जो चारशे पारचा नारा दिला आणि भाजपला संविधान बदलण्यासाठीच चारशे खासदार हवे आहेत, असा नॅरेटिव्ह सेट करण्यात लोकसभा निवडणुकीत विरोधक यशस्वी झाले. नांदेडमधील पराभवाचेही तेच कारण असल्याचे पक्ष निरिक्षक म्हणून आलेले विखे म्हणाले. केंद्र सरकारने विविध जनहिताच्या योजना राबविल्या. परंतु, विरोधकांकडून संविधान बदलणार, अशा विश‍िष्ट समाजामध्ये अफवा पसरविण्यात आल्या.

यातून काँग्रेसला यश मिळाले असले तरी ते चुकीच्या माध्यमातून मिळवण्यात आले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उबाठा) (Shivsena) यांचे हे यश म्हणता येणार नाही. एक नॅरेटिव्ह सेट करून तो जनतेमध्ये पसरविण्यात आला. कांद्याच्या प्रश्नावर मात्र शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी असल्याची कबुली विखे पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत भाजपचा (Bjp) पराभव केल्याबद्दल अनेकांना आता पश्चातप होत असून विधानसभेला मतदार पुन्हा भाजपकडे वळतील, असा दावा विखे पाटील यांनी केला.

चिखलीकर यांच्या पराभवाची खंत आहे. पुन्हा एकदा त्यांनी पक्ष बांधणी करून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करावे. या निवडणुकीत अपयशातून झालेलल्या चुका निश्तिच सुधारल्या जातील. ओबीसी, मराठा समाजाबाबत शासनाची कोणावरही अन्याय होऊ नये, अशी भूमिका आहे. परंतू, गैरसमज निर्माण करण्यात येत आहेत. आंदोलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, बैठकीपूर्वी झालेल्या गोंधळावर सहा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला मला कुठेही गटबाजी दिसून आली नसल्याचे विखे यांनी सांगितले. बाहेर काय घडले हे मला कोणी सांगितले नाही, असे म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT