Video Nanded Bjp News : नांदेडमधील भाजपच्या चिंतन बैठकीपूर्वीच कार्यकर्ते भिडले; शाब्दिक चकमकीमुळे वाद चव्हाट्यावर

Politcal News : लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. रविवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नांदेड दौऱ्यावर आले होते. मात्र, या बैठकीपूर्वीचं कार्यकर्ते भिडल्याचे पुढे आले आहे.
BJP Latest News
BJP Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघात भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे याचे चिंतन करण्यासाठी भाजपकडून पराभव झालेल्या ठिकाणी बैठक घेतली जात आहे. मात्र, या बैठकीत चिंतन करण्याऐवजी प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमकीमुळे वाद रंगत असल्याने अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. रविवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नांदेड दौऱ्यावर आले होते. मात्र, या बैठकीपूर्वीचं कार्यकर्ते भिडल्याचे पुढे आले आहे.

नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचे (Bjp) उमेदवार प्रतापराव पयली चिखलीकर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे या पराभवाचे कारण शोधण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील रविवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. या बैठकीपूर्वीचं कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, कार्यकर्ते भिडल्याचे पुढे आले आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

शनिवारी चिखलीकर यांच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्ष निरीक्षक राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड दौ-यावर येणार होते. परंतु, ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात येणार असल्याकारणाने दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर रविवारी पक्ष निरीक्षक विखे पाटील (Radhakrishn Vikhe patil) यांचे विशेष विमानाने नांदेडमध्ये दुपारी बाराच्या सुमारास आगमन झाले.

विश्रामगृहावर येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर कार्यकर्ते भिडले. तुम्ही निवडणुकीत काम केले नाही आणि बैठकीत हजर राहता, अस म्हणत कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले होते. त्यानंतर काही जणांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.

BJP Latest News
Nanded Loksabha Constituency : 'काही लोकांना लायकी नसताना पक्षानं मोठं केलं,पदं दिली'; चिखलीकरांचा रोख कोणाकडं?

नांदेडमधील आभार बैठकीत दोन पदाधिकाऱ्यांच्या सर्मथकांनी असाच गोंधळ घालत एकमेकांच्या विरुद्ध नारेबाजी केली होती. निवडणुकीत महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी काम केले नाही, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे दोन गटातील वाद चांगलाच रंगला आहे.

अशोक चव्हाणांची दोन्ही बैठकांना दांडी

नांदेड लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शनिवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यानंतर रविवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील बैठक घेतली. मात्र, दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) गैरहजर होते. ते खासगी कामानिमित्त मुंबईला असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचे समजते.

BJP Latest News
Ashok Chavan : नांदेडच्या पराभवावर मंथन पण अशोक चव्हाणांचीच दांडी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com