Rahul Gandhi Sarkarnama
मराठवाडा

Kalyan Kale News : काँग्रेस खासदाराचा दावा, राहुल गांधी यांच्या वाढत्या प्रभावामुळे 2029 मध्ये भाजपची सत्ता जाणार!

Lok Sabha election News : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी उचललेले संविधान रक्षणाचे मुद्दे देशभर प्रभावी ठरत आहेत. देशात त्यांचे नेतृत्व बहरत असून त्यांचा प्रभाव वाढतो आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Congress : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी उचललेले संविधान रक्षणाचे मुद्दे देशभर प्रभावी ठरत आहेत. देशात त्यांचे नेतृत्व बहरत असून त्यांचा प्रभाव वाढतो आहे. या प्रभावामुळेच 2029 मध्ये जनतेच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता जाणार, असा दावा खासदार कल्याण काळे यांनी केला. भाजपला सत्तेबाहेर करण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचेही काळे यांनी सांगितले.

भाजप सरकार देशातील जुन्या राजकीय आणि सामाजिक समीकरणांचे तुकडे करण्याचे काम करत आहे. त्याविरोधात सर्व धर्मनिरपेक्ष आणि संविधानवादी शक्तींनी एकत्र येणे काळाजी गरज आहे, असे आवाहनही काळे यांनी केले. 2029 मध्ये देशात सत्ताबदल अटळ असल्याचा दावाही काळे यांनी केला.

तृणमूल काँग्रेस हा मूळतः काँग्रेसच्या विचारधारेतून निर्माण झालेला पक्ष आहे. देशातील धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी समान विचारांच्या पक्षांनी आता एकत्र येणे आवश्यक आहे. इंडिया आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? याविषयावर एकमत होत नाहीये.

यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात? याकडे काळे यांचे लक्ष वेधले असता याचा निर्णय दिल्लीतील वरिष्ठ नेते घेतील. काँग्रेस पक्षाला कोणाच्याही नेतृत्व क्षमतेबद्दल शंका नाही. अगदी राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दलही, असा टोला काळे यांनी लगावला.

काँग्रेसच्या (Congress) संघटनात्मक पुनर्बांधणीला वेग देण्यात येत असून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शहर आणि ग्रामीण भागात पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एमआयएम आणि नव्याने स्थापन झालेल्या पक्षांबाबत बोलताना मुस्लिम समाज केवळ एका पक्षाच्या मागे उभा राहत नाही, तर संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी मतदान करतो, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत सर्व समाजघटकांनी संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा दिला. काँग्रेसमधील नेतृत्व बदल ही नियमित संघटनात्मक प्रक्रिया असल्याचे सांगत त्यांनी नव्या नेतृत्वामागे संपूर्ण पक्ष एकजुटीने उभा असल्याचे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT