Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Raj Thackeray In Jalna: लाठीमाराचे आदेश देणाऱ्यांना मराठवाडाबंदी करून टाका; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे ?

Jalna Maratha Andolan: पुतळा, आरक्षणावरून सरकार मराठा समजाला झुलवत ठेवते

Sunil Balasaheb Dhumal

Jalna Political News : निष्पाप लोकांवर काठ्या बरसल्याचे पाहून राहवले नाही म्हणून भेटालया आलो आहे. यात पोलिसांचा काही दोष नाही. तर पोलिसांना कुणी आदेश दिले त्यांचा दोष आहे. पोलिसांनी फक्त आदेशाचे पालन केले. त्यामुळे ज्यांनी लाठीमाराचे आदेश दिले, त्या सर्वांना मराठवाडा बंदी करून टाका, असा घणाघात राज ठाकरेंनी आंदोलकांसमोर केला. (Latest Political News)

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आरक्षणासाठी मराठा आंदोलकांवर शुक्रवारी अमानुष लाठीचार्ज कारण्यात आला. यानंतर आंदोलकांची भेट घेण्यासाठी विरोधकांसह सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या लाठीमारास सरकारच जबाबदार असल्याचा थेट हल्लाबोल केला होता. तसेच उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधत भेट घेणार असल्याच सांगितले होते. यानुसार ठाकरेंनी सोमवारी जरांगेंची भेट घेतली.

राज ठाकरेंनी आंदोलक जरांगेंशी संवाद साधत मराठा आरक्षणाबाबत माहिती घेतली. यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. "काल विरोधकांमध्ये असलेल्या लोकांना मराठा आरक्षणाबाबत मोठे प्रेम होते. आता सत्तेत आल्यानंतर मात्र समाजावर लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले. आज विरोधतातील असलेल्या मंडळीही याहून वेगळी नाही. गेंड्याची कातडी पांघरलेल्या राजकारण्यांच्या नादी लागू नका," असा सल्ला राज यांनी जरांगे यांना दिला आहे.

मराठवाड्यातील मराठ्यांचा मुद्दा नेमका काय आहे, हे समजून घेतल्यानंतर ठाकरेंनी "मी तुम्हाला खोटे आश्वासन देणार नाही. याबाबत मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. त्यांना योग्य निर्णय घेण्यास लावू. तोपर्यंत आंदोलकांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे सांगितले.

राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरहून सोमवारी सकाळी जालन्याकडे रवाना झाले होते. या मार्गावर राजापूर गावानजीक त्यांचा ताफा आंदोलकांनी अडवला. या वेळी त्यांचा ताफा अडवूंन आंदोलकांनी त्यांच्याकडे मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासह विविध मागण्या केल्या. यावेळी अमित ठाकरेही त्यांच्यासोबत होते. दरम्यान, आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगेंनाही या बैठकीस बोलवल्याची माहिती आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT