Jalna :"तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. त्यांना निर्णय घ्यायला लावू," असा शब्द मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना दिला. "राजकारणांच्या नादी लागू नका," असा सल्ला राज यांनी जरांगेंना दिला.
मराठा समाजाच्या काय मागण्या आहेत, याबाबत ठाकरेंनी जरांगेकडून माहिती घेतली. अमित ठाकरे त्यांच्या सोबत होते. कालच (रविवार) मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा केली होती.
मराठा आंदोलनाला मनसेचा पाठिंबा असल्याचे राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केला होता. जरांगे यांच्याशी फोनवरून विचारपूस करून सांत्वन करत सोबत असल्याची ग्वाही ठाकरेंनी दिली. त्यानंतर आज राज ठाकरेंनी त्यांची भेट घेतली.
"जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे," असे टि्वट राज ठाकरे यांनी केले आहे.
जरांगे पाटलांचे उपोषण सुरु असलेल्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी सोमवारी सकाळी राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरहुन जालन्याकडे निघाले होते. यावेळी या महामार्गावर राजापूर गावानजीक त्यांचा ताफा आंदोलकांनी अडवला. या वेळी त्यांचा ताफा अडवूंन आंदोलकांनी त्यांच्याकडे मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासह विविध मागण्या केल्या आहेत.
आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथी गृहात होणार आहे. बैठकीत आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.