Jayant Patil Criticized Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Jayant Patil News : राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, जयंत पाटलांचा चिमटा; म्हणाले, 'ते स्वतःसाठी लढतात का?'

Sachin Waghmare

Parabhni News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच पक्षांकडून आता निवडणुकीची तयारी केली जात आहे. त्यासाठी सर्वच पक्षांच्या जोरबैठका सुरु आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणीत मेळावा घेतला. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून टोला लगावला.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. आघाडी येत्या विधानसभेत 175 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा जयंत पाटील यांनी केला. निष्ठावान संवाद दौऱ्याच्या निमित्ताने जयंत पाटलांनी (Jaynat Patil) परभणी येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विरोधकांवर शेलक्या शब्दांत हल्ला केला. (Jayant Patil News)

मनसेचे प्रमुख राज ठाकरेंना (Raj Thackeray) स्वतः साठी लढायचे आहे का दुसऱ्यांची मत फोडायसाठी? ते दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी लढत असतील. त्यासोबतच राज ठाकरेंच्या 225 जागा लढवण्यावरही त्यांनी भाष्य करीत जयंत पाटील यांनी टोला लगावला. हसन मुश्रीफ यांनी 165 जागा जिंकणार असल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांना ते माहित आहे का, लोकसभेवेळी भाजपने 400 पारचा नारा दिला होता, तसाच विधानसभेला 200 पारचा नारा दिला आहे. त्यामुळे भाजप हसन मुश्रीफ यांच्या या दाव्यामुळे नाराज होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सत्ता, साधन संपत्ती, खोटी आश्वासने, महागाई, प्रचंड बेरोजगारी, पददलिंतांवर होणारा अन्याय, महिलांवर होणारे अत्याचार, आणि शेतकऱ्यांविरोधातील धोरणे हा भाजपचा स्थायी भाव झालेला आहे. खुर्ची टिकवण्यासाठी पडेल ती किंमत देण्याची तयारी भाजपची आहे. त्यामुळेच अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश आणि बिहारला झुकते माप दिले गेले. महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पाने पुसण्यात आली, अशी टीका जयंत पाटलांनी केली.

सर्वात भ्रष्ट पक्ष कोणता?

जालना ते नांदेड एक्स्प्रेस वेचे टेंडर 11 हजार 441 कोटींचे होते. ते गेले 15 हजार 464 कोटींवर आहे. कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनीला दिले आहे ती कंपनी ब्लॅकलिस्ट झालेली आहे. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा सर्वात भ्रष्ट पक्ष कोणता आहे आणि कोण त्याचा म्होरक्या आहे? अशा शब्दांत जयंत पाटील यांनी टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT