Rajesh vitekar shrikant vitekar ajit pawar parbhani zp.jpg Sarkarnama
मराठवाडा

Parbhani ZP News: राजेश विटेकरांच्या भावाचा मताधिक्याचा 'रेकाॅर्ड'; पण अजित पवारांचं स्वप्न राहिलं अपूर्णच!

NCP MLA Rajesh Vitekar News: राजेश विटेकर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या भावाला उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्यावर घराणेशाहीची टीकाही झाली होती. परंतु भावाला सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणत राजेश विटेकर यांनी विरोधकांची तोंड बंद केल्याचे बोलले जाते.

Jagdish Pansare

ZP Election News : परभणी नगरपालिका, नगरपंचायत आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतील अपयशामुळे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवगंत नेते अजित पवार काहीसे नाराज होते. याबद्दल त्यांनी आमदार राजेश विटेकर यांच्याकडे खंतही व्यक्त केली होती. तसेच जिल्हा परिषदेसाठी चांगले नियोजन करा, पण रिझल्ट द्या, असे ते विटेकर यांना म्हणाले होते. परभणी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे अजित पवार यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.

आमदार राजेश विटेकर यांनी आपले बंधु श्रीकांत विटेकर यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणत एक नवा रेकाॅर्ड करत तो अजित पवारांना समर्पित केला असला तरी राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात त्यांना यश मिळू शकले नाही. राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये श्रीकांत विटेकर यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गटातून 8334 मते मिळवून श्रीकांत विटेकर यांनी हा आगळा वेगळा रेकाॅर्ड केला आहे. श्रीकांत विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांचे भाऊ आहेत. या मताधिक्यामुळे विटेकर कुटुंबाने या गटातील नेतृत्वाचे परंपरागत स्थान बळकट असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी या गटाचे नेतृत्व राजेश विटेकर व त्यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर यांनी केले आहे.

राजेश विटेकर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या भावाला उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्यावर घराणेशाहीची टीकाही झाली होती. परंतु भावाला सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणत राजेश विटेकर यांनी विरोधकांची तोंड बंद केल्याचे बोलले जाते.

अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. या घटनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह राज्यातील सर्वच जण शोकसागरात बुडाले होते. आमदार राजेश विटेकर हे अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. त्यामुळे विटेकर यांना या घटनेने मोठा धक्का बसला होता.

या दुर्घटनेच्या काही दिवस आधीच जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारी संदर्भात आपले अजितदादांशी बोलणे झाल्याची आठवण विटेकर यांनी सांगितली होती. तेव्हा मागच्या निवडणुकीत झालेल्या चुका टाळ, व्यवस्थित नियोजन कर, मला रिझल्ट पाहिजे, असे अजित पवार विटेकर यांना म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT