Nitesh Rane : सिंधुदुर्गमध्ये नितेश राणेंना नडून भाजपचे 5 बंडखोर विजयी; तळकोकणात ‘अदृश्य शक्ती’ने पुरवली रसद?

sindhudurg zilla parishad result mahayuti majority : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे निकालातही राज्यात भाजपच मोठा पक्ष ठरला असून तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपाप्रणीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपप्रणीत महायुतीने स्वबळावर बहुमत मिळवत मोठे यश संपादन केले आहे.

  • शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून अपक्षांपेक्षाही कमी उमेदवार निवडून आले आहेत.

  • निकालानंतर मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत अदृश्य शक्तींना इशारा दिला.

sindhudurg zilla parishad result News : सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निकालानंतर आता महायुती बहुमताने सत्तेवर बसणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकाबाजूला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील तब्बल 5 जिल्हा परिषद सदस्यपदी भाजपचे बंडखोर अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. या विजयात या अपक्षांना अदृश्य शक्तींनी साथ दिली रसद पुरवली असा तर्क वितर्क लावला जात असून तशी चर्चा रंगली आहे. दरम्यान आता भाजप नेते पालकमंत्री नितेश राणे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना अपक्षांना साथ देणाऱ्या अदृश्य शक्तींसह अपक्षांनाही इशारा दिला.

शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. कणकवली आणि कुडाळ विधानसभा मतदार संघात महायुतीने एकहाती वर्चस्व ठेवले. मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बंडखोरांनी महायुतीला धक्के दिले आहेत. यामुळे नेतृत्व करणाऱ्या खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यावर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.

एकीकडे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपाप्रणीत महायुतीने स्वबळावर बहुमताचा आकडा गाठला असतानाच मंत्री नितेश राणे यांच्या वैभववाडी आणि तळकोकणातील पंचायत समित्यांच्या जागांवरही भाजपाला मोठे यश मिळाले. दुसरीकडे- शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून त्यांचे अपक्षांपेक्षाही कमी उमेदवार निवडून आले.

Nitesh Rane
'...म्हणून तोंड लपवत फिरताहेत' राणेंचा ठाकरे गटावर घणाघात Nitesh Rane, Shivsena UBT, Sindhudurg

पण तब्बल 5 जिल्हा परिषद सदस्यपदी भाजपचे बंडखोर अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ज्यांना अदृश्य शक्तींनी मोठी रसद पुरवल्याची चर्चा आहे. यावरूनच निकालानंतर मंत्री नितेश राणे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. त्याशिवाय अपक्षांना साथ देणाऱ्या अदृश्य शक्तींना त्यांनी इशाराही दिला.

नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळताना दिसून येत आहे. सध्या अनेक ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जागांवर महायुतीचे उमेदवार पुढे आहेत. २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे ५० पैकी ४२ उमेदवार निवडून आले होते. यंदाही आम्हाला जवळपास ४६ ते ४७ जागांवर नक्कीच विजय मिळेल. ग्रामीण भागात मिळालेल्या सत्तेच्या आधारे आम्ही विकास कामांना गती देऊ. आम्ही साडेचार लाख दरडोई उत्पन्न करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.

तसेच निवडून आलेले पाचही अपक्ष उमेदवार भाजपातील बंडखोर असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून ते निवडून आले आहेत. ज्यांच्यांमुळे महायुतीला मोठा फटका बसला. पण या विजयात काही अदृश्य शक्तींचा हात होता. ते मदत करणारे हात बाजूला केले जातील. भाजपच्या विरोधात काम करणाऱ्या हातांना बाजूला करण्याची वेळ आता आल्याचेही सांगत त्यांनी तळकोकणात अपक्षांना रसद पुरवणाऱ्या अदृश्य शक्तींना इशारा दिला आहे.

Nitesh Rane
Nitesh Rane Fund Controversy : राणेंचं मंत्रिपद धोक्यात? राज्यपाल कारवाई करणार? ठाकरेंच्या शिलेदारानं 'पिच्छा' पुरवण्याचं ठरवलं

FAQs :

1. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाला बहुमत मिळाले?
भाजपप्रणीत महायुतीने स्वबळावर बहुमताचा आकडा गाठला आहे.

2. कोणत्या भागात भाजपला विशेष यश मिळाले?
वैभववाडी आणि तळकोकणातील पंचायत समित्यांच्या जागांवर भाजपला मोठे यश मिळाले.

3. शिवसेना ठाकरे गटाची कामगिरी कशी राहिली?
ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून त्यांचे अपक्षांपेक्षाही कमी उमेदवार निवडून आले.

4. निकालानंतर नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि अदृश्य शक्तींना इशारा दिला.

5. या निकालाचा कोकणच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
भाजपची ताकद वाढली असून शिवसेना ठाकरे गटासाठी आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com