Ambadas Danve Allegaition On Haribhau Bagde On Raju Shinde Re-entry In BJP Sarkarnama
मराठवाडा

Raju Shinde : ठाकरेंना रामराम केलेल्या नेत्याचा 9 महिन्यांनंतर भाजप प्रवेश; थेट राजस्थानच्या राजभवानातून सूत्र फिरली?

Shivsena Leader Ambadas Danve Allegation On BJP : एकमेकांच्या पक्षातील पदाधिकारी, नेते फोडले जात असल्याने महायुतीली घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेतील तणाव कमालीचा वाढला.

Jagdish Pansare

  1. राजू शिंदे यांच्या घरवापसीमागे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

  2. या वक्तव्यामुळे शिवसेना व भाजपमध्ये नव्या आरोप–प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे.

  3. शिंदे यांच्या पुनर्प्रवेशावरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Shiv sena UBT News : विधानसभा निवडणुकीच्यावेळी राजू शिंदे यांना शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याला आम्ही उमेदवारी दिली, लाखावर मते त्याला आमच्या पक्षामुळे मिळाली. आता तोच भाजपमध्ये प्रवेश करताच शिवसेनेला संपवण्याची भाषा करत आहे. खरतरं तो बच्चा आहे, आम्ही संधी दिलेली असताना पक्ष सोडून जाणे म्हणजे ही नमकहरामी आहे. भाजपमधला एकही स्थानिक नेता त्याला पक्षात घ्यायला इच्छूक नव्हता.

राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांच्यामुळे त्या पक्षात प्रवेश देण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. हरिभाऊ बागडे यांनी अशा प्रकरणात लक्ष घालायला नको होते असेही दानवे म्हणाले. नऊ महिन्यापासून राजू शिंदे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करत होता. स्थानिकचा एकही नेता त्याला पक्षात घेण्यास उत्सुक नव्हता, अशा छोट्या माणसाने शिवसेना संपवण्याची भाषा करणे जर अतीच झाले, असे म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली.

एकमेकांच्या पक्षातील पदाधिकारी, नेते फोडले जात असल्याने महायुतीली घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेतील तणाव कमालीचा वाढला. काल मंत्रीमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकत थेट मुख्यमंत्र्यांच्या आंदोलनात ठिय्या देत नाराजी व्यक्त केली. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शिष्टमंडळाला गप्प करत परत पाठवले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढलेले आणि पराभूत झालेले राजू शिंदे यांचा काल भाजपमध्ये प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्याने संजय शिरसाट कमालीचे संतापले. याशिवाय राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये एकमेकांच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी केली जात असल्याने भाजप-शिवसेनेत तणाव आहे.

दरम्यान, राजू शिंदे यांनी भाजपमध्ये घरवापसी करताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संपवण्याची भाषा केली. यावर अंबादास दानवे यांनी राजू शिंदे हा नमकहराम आणि बच्चा असल्याचे म्हणत टीका केली. पालघर येथे साधू-संतावर हल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या आरोपींना भाजपध्ये प्रवेश दिला जातो. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी यांच्या पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे, यावरून भाजपचा नैतिकतेशी काही संबंध राहिला आहे का? असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या मंत्र्यांचे बाॅस झाले आहेत. सगळ्याच मंत्र्यांचे हात दगडाखाली अडकले असल्याने आता त्यांच्यात एकमत झाले असल्याचे दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील पन्नास टक्के आरक्षण मर्यादेवर निवडणुक आयोगाने आधीच लक्ष द्यायला हवे होते, असेही दानवे म्हणाले.

FAQs

1️⃣ राजू शिंदे यांची घरवापसी नेमकी कोणत्या संदर्भात चर्चेत आली?

त्यांच्या पुनर्प्रवेशात राजकीय हस्तक्षेप आणि राज्यपालांचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले.

2️⃣ अंबादास दानवे यांनी काय आरोप केला आहे?

दानवे यांनी दावा केला आहे की शिंदे यांच्या घरवापसीसाठी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी भूमिका बजावली.

3️⃣ राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे का?

या क्षणी अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध नाही; राजकीय प्रतिक्रिया मात्र सुरू आहेत.

4️⃣ शिंदे यांच्या घरवापसीचा राजकीय पक्षांवर कसा परिणाम झाला?

शिवसेना–भाजपमध्ये तणाव वाढला असून, वादळ आणखी गडद झाले आहे.

5️⃣ पुढे या प्रकरणाचा राजकीय समीकरणांवर काय प्रभाव होऊ शकतो?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दा मोठं राजकीय हत्यार बनू शकतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT