Shivsena UBT News : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून राजू शिंदे निवडणूक लढले. शिवसेना शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्याविरोधात त्यांचा थेट सामना झाला. 2019 मध्ये बंडखोरी करून शिरसाट यांच्याविरोधात लढलेल्या राजू शिंदे यांना केवळ 42 हजार मते मिळाली होती. पण उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिल्यानंतर यावेळी राजू शिंदे यांना एक लाख मते मिळाली.
मात्र पराभव झाल्यानंतर काल राजू शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. आपल्या राजीनामा पत्रात शिंदे यांनी चंद्रकांत खैरे (Chandrakant Kahire) यांच्यावर नाराज असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राजू शिंदे यांचा समाचार घेतला. राजू शिंदे पक्षात थांबणार नाही हे मला आधीच माहीत होते. म्हणूनच मी त्याच्या प्रवेशाला विरोध केला होता, पण अंबादास दानवे यांनी त्याला पक्षात घेतले आणि उमेदवारीही दिली.
पक्षाने आदेश दिल्यानंतर लोकसभेला माझ्या विरोधात काम करूनही मी राजू शिंदे याचे काम केले. अडीच तीन हजार लोकांना वैयक्तिक फोन करून मतदान करण्याचे आवाहन केले. (Shiv Sena) तरीही जर राजू शिंदे माझ्यावर खोटेनाटे आरोप करत असेल तर मी त्याच्या तोंडात मारेन, असा दम चंद्रकांत खैरे यांनी भरला. राजू शिंदे पक्षात आल्याने नुकसान झाले आहे, पक्षाला डिस्टर्ब करण्यासाठीच तो आला होता, असा आरोपही खैरे यांनी यावेळी केला. राजकारणात जे जे कोणी मला त्रास देतील त्यांना भद्रा मारुतीची गदा पडेल, असा शापही खैरे यांनी दिला.
पक्षात आल्यापासूनच राजू शिंदे यांनी गटबाजी करत आपल्या जाहिरातींमध्ये एकाच नेत्याचे फोटो छापणे, त्याच्याशी संपर्क साधने असे प्रकार सुरू केले होते. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना चुकीची माहिती दिली. त्यामुळे पक्षाचा पराभव तर झालाच पण संघटनात्मक मोठे नुकसानही झाले. भाजपमधून आलेल्या सिल्लोडच्या सुरेश बनकर आणि राजू शिंदे या दोघांसाठी मी काम केले.
पण सिल्लोडमध्ये बनकर यांनी सत्तारशी ऍडजेस्टमेंट करून घेतली, असा आरोपही खैरे यांनी केला. राजू शिंदे हा डरपोक आहे त्याला दाढीचे केस नाही, अशी खिल्लीही खैरे यांनी उडवली महापालिकेतील योजनांमध्ये खोडा घालणे, त्या पूर्ण होऊ न देणे हाच राजू शिंदे याचा पूर्वीपासून धंदा आहे. चिकलठाणा परिसरात ब्लॅकमेलिंग करत त्याने आपली दहशत निर्माण केली आहे, त्यामुळेच माझा त्याला पक्षात घेण्यासाठी विरोध होता, असेही खैरे म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.