Raju Shinde Join BjP In presence Of CM Devendra Fadnavis News Sarkarnama
मराठवाडा

Raju Shinde Join BJP News : दीड वर्ष वेटिंगवर ठेवल्यानंतर राजू शिंदे देवाभाऊच्या साक्षीने करणार भाजपमध्ये घरवापसी!

BJP Political Movement In Chhatrapati Sambhajinagar : 2019 मध्ये राज्यात शिवसेना-भाजपची युती असताना राजू शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत संजय शिरसाट यांच्याविरोधात पश्चिम मतदारसंघातू निवडणूक लढवली होती.

Jagdish Pansare

  1. बंडखोरी करून पक्ष सोडलेल्या राजू शिंदे यांनी अखेर पुन्हा भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.

  3. शिंदे यांच्या पुनर्प्रवेशामुळे संभाजीनगर जिल्ह्यात भाजपचे समीकरण पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.

BJP Political News : एकदा नव्हे तर अनेकदा बंडखोरी अन् गेल्या विधानसभा निवडणुकीत थेट भाजपला रामराम करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेलेले राजू शिंदे पुन्हा भाजपात घरवापसी करत आहेत. मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवत शिंदे यांनी लाखावर मतं घेतली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून स्वगृही परतण्यासाठी ते धडपडत होते. परंतु स्थानिक काही नेत्यांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होता.

2019 मध्ये राज्यात शिवसेना-भाजपची युती असताना राजू शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत संजय शिरसाट यांच्याविरोधात पश्चिम मतदारसंघातू निवडणूक लढवली होती. अपक्ष लढलेल्या राजू शिंदे यांची मजल 40 हजार मतांपर्यंत पोहचली होती. बंडखोरीची शिक्षा म्हणून भाजपने त्यांची पक्षातून हाकालपट्टी केली होती. परंतु भाजपच्या सगळ्याच कार्यक्रमात ते वावरत होते. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही वरवरची होती हे दिसून आले होते.

2024 मध्ये पुन्हा राजू शिंदे यांनी पश्चिम मतदारसंघातून विधानसभा लढवण्यासाठी थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षानेही शिरसाट यांना धडा शिकवण्यासाठी शिंदे यांना उमेदवारी देत ताकद दिली. बंडखोरी करून अपक्ष असतांना चाळीस हजार मतं घेणाऱ्या शिंदे यांनी मशाल हाती घेऊन निवडणूक लढवताच त्यांच्या मतांचा आकडा लाखावर पोहचला. पण बाजी मारली ती संजय शिरसाट यांनीच. पराभवानंतर राजू शिंदे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर आरोप करत उद्धव ठाकरे यांनाही जय महाराष्ट्र केला.

तेव्हापासून राजू शिंदे भाजपामध्ये घरवापसीसाठी प्रयत्न करत होते. परंतु मंत्री अतुल सावे यांचा त्यांना कडाडून विरोध होता. भाजपमध्ये शिंदे यांच्या घरवापसीवरून दोन गट तयार झाले होते. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून वेटिंगवर असलेल्या शिंदे यांचा पक्षप्रवेश आता कन्फर्म झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणातलं एक मोठं आणि महत्वाच नाव म्हणजे राजू शिंदे . त्यांनी शहराचं उपमहापौरपदही भूषवलं आहे. भाजपमधून राजकीय कारकीर्द सुरु करणारे राजू शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेतही गेले होते. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाठ यांच्याविरोधात पश्चिम मतदारसंघात निवडणूक लढवली होती.

दरम्यान, हेच राजू शिंदे आता त्यांच्या मूळ पक्षात म्हणजेच भाजपत घरवापसी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 16 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस 16 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरचा दौऱ्यावर आहेत. तिथे ते भारतीय जनता पार्टीच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. याच कार्यक्रमात राजू शिंदे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत.

पराभवानंतरच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र

राजू शिंदे यांनी 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. स्वतः उद्धव ठाकरेंनी या पक्षप्रवेशाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर पश्चिमची उमेदवारीही दिली होती. यावेळी राजू शिंदे यांनी संजय शिससाठ यांच्याविरुद्ध लाखांच्यावर मतदानही मिळवलं होतं. दरम्यान, पराभवानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकात खैरै यांच्यावर प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत केल्याचा खळबळजनक दावा केला होता. यावरुनच नाराज असल्याने त्यांनी पक्षाला रामरामही केला होता.

दरम्यान, राजू शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विशेषतः महापालिकेत पक्षाला फायदा होणार आहे. जिल्हा परिषदेसाठीही शिंदे यांची मोठी मदत पक्षाला होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. महापालिका निवडणुकीत राजू शिंदे यांचा प्रभाग आरक्षित झाला आहे. त्यामुळे नगरसेवक होण्यासाठी त्यांना नवा प्रभाग शोधावा लागणार आहे. भाजप प्रवेशानंतर त्यांच्यासाठी कोणता प्रभाग सोयीचा ठरेल हे पहावे लागेल.

आता दीड वर्ष वेटिंगवर ठेवल्यानंतर आता राजू शिंदे यांच्या घरवापसीचे टायमिंग साधण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 16 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्येच राजू शिंदे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्थानिक नेत्यांचा विरोध मोडीत काढत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे मानसपूत्र असलेले शिंदे भाजपमध्ये परतत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजू शिंदे यांचा भाजप प्रवेश पक्षाला फायदेशीर ठरू शकतो.

FAQs

1. राजू शिंदे कोणत्या पक्षात पुन्हा प्रवेश करत आहेत?
ते पुन्हा भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करत आहेत.

2. त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला कोण उपस्थित असणार आहेत?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

3. राजू शिंदे यांनी पूर्वी पक्ष का सोडला होता?
स्थानिक नेतृत्वाशी मतभेद आणि उमेदवारीसंबंधी नाराजीमुळे त्यांनी भाजप सोडला होता.

4. त्यांच्या पुनर्प्रवेशामुळे संभाजीनगरच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
भाजपची संघटना मजबूत होण्यास मदत होईल आणि स्थानिक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

5. पक्ष नेतृत्वाने त्यांच्या परताव्याबाबत काय प्रतिक्रिया दिली?
भाजप नेत्यांनी राजू शिंदे यांचे स्वागत केले असून त्यांना पक्षात महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT