Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या 10 वर्षात शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र पायाभूत सुविधा तशाच आहेत, त्यात बदल व्हायला पाहिजे. आपण आमदार झाल्यानंतर प्रथमतः शहरातील पायाभूत सुविधा निर्माण करू. त्या ही शाश्वत असल्या पाहिजेत, असे मत महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी व्यक्त केले. शहरातील आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांचा उहापोह शिंदे यांनी यावेळी केला.
छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक वारसेने नटलेले शहर आहे. मात्र सध्याचे आमदार, खासदार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे विकास होत नाही, याउलट पश्चिम महाराष्ट्राचे चित्र आहे. (Shivsena) ते विकासासाठी एकत्र येतात, तशीच आपली मानसिकता असणे गरजेचे आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, तो सुटत नाही. 792 कोटीची समांतर योजना होती, ही योजना 1260 कोटींची झाली. नंतर ती योजना रद्द केली, तेव्हापासून पिण्याच्या प्रश्न सुटत नाही.
जायकवाडीतून गळती न होता पाणी आल्यास शहराचा पाणी प्रश्न सुटू शकतो. माझ्या प्रभागात असलेल्या एमआयडीसी क्षेत्रात 250 कंपन्या करोना काळात सुरू झाल्या. मात्र माझ्या बाबतीत नकारात्मक प्रतिमा बनवण्याचे काम विरोधक करीत आहे. जर मी वसुली करणारा असतो तर उद्योजकांनी माझा सत्कार केला नसता. एमआयडीसी चिकलठाणा येथे कंपनी वाढवल्या.
विरोधकांनी विस्तार करण्यासाठी करोडी भागात एमआयडीसी वळविली तेथे त्यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी आहे. त्यांच्या लोकांकडे मुद्दे नाहीत, त्यांनी खोटा उमेदवार उभा केला होता. टेंडर यांना भेटत नाही म्हणून रस्ता खराब करतात. (Sanjay Shirsat) त्यांचे मतदार संघात लक्ष नाही. आमदार झाल्यानंतर ट्रेनिंग सेंटर सुरू करणार. यांच्या कार्यकाळात सातारा खंडोबाच्या मंदिराला निधी मिळाली नाही. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 64 कोटी रुपये आणले.
पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा एन 1 सारखा करायचा आहे. येथील महापालिकेच्या शाळा खासगी इंग्रजी शाळे सारख्या बनवल्या. यासाठी सिएसआर फंड वापरला गेला. शाळा चांगली केली, शाळेची सहल स्वखर्चाने करतो. सातारा देवळाई येथील गुंठेवारीची प्रश्न मार्गी लावणार, माझी प्रतिमा नकारात्मक करून विरोधक रडीचा डाव खेळत आहे, अशी टीका राजू शिंदे यांनी केली.
एकीकडे लाडकी बहिण योजना आणली तर दुसरीकडे महागाई वाढवली. आता ही निवडणूक पश्चिम मतदार संघातील लोकांनी मनावर घेतली आहे. लोकं अफवावर विश्वास ठेवणार नाही. त्यांनी बाळासाहेबांचे वारस असलेल्या उध्दव ठाकरे यांना धोका दिला आहे. त्यांना शिवसैनिक जागा दाखवून देणार आहेत. प्रत्येक कामात टक्केवारी घेतात. धाक दडपशाही करतात, हे आता सर्व सामान्य लोकांना समजून येत आहे, असेही शिंद म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.