Om Prakash Rajenimbalkar, Ranajagjitsinha Patil
Om Prakash Rajenimbalkar, Ranajagjitsinha Patil Sarkarnama
मराठवाडा

Ranajagjitsinha patil Vs Omprakash Rajenimbalkar : अर्धवटराव, पावशेरसिंह; आमदार पाटील-खासदार राजेनिंबाळकर भिडले

सरकारनामा ब्यूरो

शीतल वाघमारे

Dharashiv : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच धाराशिव जिल्ह्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे एकमेकांवर शाब्दिक वार करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघांनीही एकमेकांवर जहरी टीका केली आहे.

ते अर्धवटराव आहेत. त्यांना काय कळतं, अशा शब्दांत आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha patil) यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांना टार्गेट केले तर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पावशेर सिंहाला कोण घाबरते, असे म्हणत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिले.

अर्धवटराव जे आहेत ते पिक विमा किंवा इतर कोणत्याही विषयांमध्ये कोर्टात जात नाहीत. फक्त चमकोगिरी करतात. उद्धव ठाकरे यांच्या काळात रेल्वेचा वाटा न मिळाल्याने रेल्वे प्रकल्पास विरोध झाला. जिल्ह्यातील एमआयडीसीविषयी त्यांनी काही सुद्धा केले नाही. समोर चार प्रश्न विचारले तरी बोलता येत नाही, अशी जहरी टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव न घेता भाजप नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लायकी काढली...

एकाच पराभवात लायकी दाखवून दिली. दुसर्‍याला बोलण्या अगोदर आपण आत्मपरीक्षण करा. पाच वर्षांपूर्वी आपण कोणाचे होता. आज कोणाचे आहात व भविष्यात अजून कोणाचे व्हाल, याची खात्री नसणार्‍यांनी मला बोलू नये. दुसर्‍या कोणाला उमेदवारी मिळू नये यासाठी तुमची धडपड सर्वांच्याच लक्षात येत आहे. पक्ष बदलला म्हणजे आत्मकेंद्री स्वभाव बदलत नसतो. माझी उमेदवारी जाहीर झाली नाही कारण तुमच्या पसंतीमुळेच ती मला मिळणार आहे, अशा तोर्‍यात बोलून आपली पावशेर अक्कल दाखवली आहे.या पावशेर सिंहाची कुवत जिल्ह्याला माहिती असल्याचे दाखवून दिले आहे, असे म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणाजगजितसिंह यांना चोख प्रत्युत्तर दिले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT