Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : आता आम्हाला नागरिकांमध्ये जायची संधी भेटली; दानवेंनी स्पष्टच सांगितले

सरकारनामा ब्यूरो

Nanded News : पक्षाचा कार्यकर्ता हे पद माझ्याकडे आहे. हे पद कोणीच काढून घेऊ शकत नाही. चिखलीकर भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मी पण ज्येष्ठ नेता आहे. आता आम्हाला लोकांमध्ये जायची संधी भेटली असल्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

नांदेड येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, असे असले तरी या देशातील जनतेने भाजपला कौल दिला आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. परंतु काँग्रेसवाले आम्हाला पूर्ण बहुमत मिळाले नाही म्हणून आनंद व्यक्त करत आहेत. इंडिया आघाडीचे सगळ्यांची जेवढे खासदार निवडून आले नाहीत त्यापेक्षा जास्त खासदार भाजपचे निवडून आले असल्याचे रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या कामाला कार्यकर्त्यांनी लागावे, यासाठी मी मराठवाड्याचा दौरा करत आहे. धाराशिव, बीड, संभाजीनगर, हिंगोली व परभणी असा दौरा करणार आहे. 2 कोटी 48 लाख मतदान भाजपला (Bjp) झालेले आहे. 2 कोटी 50 लाख मत इंडिया आघाडीला पडले आहेत. मतामध्ये फार अंतर नाही. त्यांनाही फार जागा मिळाल्या असे नाही, कोणाला मिळाल्या 8, कोणाला मिळाल्या 9, कोणाला मिळल्या 13 या सगळ्यांची गोळा बेरीज करून करून ते आकडा फुगवून सांगत आहेत.

देशभरात जनतेने आम्हाला समर्थन दिले आहे. आता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यासाठी हा दौरा असल्याचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

राजकारणामध्ये पराभवाला अनेक कारणे असतात. वेगवेगळ्या कारण, वेगवेगळ्या गोष्टींन मतदारांना जो कौल दिला याचा अर्थ त्यांच्याच बाजूने दिला असा होत नाही. कधी-कधी असे काही मुद्दे येतात की ते कोण्या एकट्या कडून संपवू शकत नाहीत. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तो समाजाचा प्रश्न म्हणून सोडवण्यासाठी मदत करण्याची गरज असते, असेही दानवेंनी यावेळी सांगितले.

सरकार म्हणून आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. दहा टक्केच आरक्षण दिल्यानंतर तो विषय संपवू शकला नाही, भविष्यामध्ये सरकार तोडगा काढेल, असेही त्यांनी सांगितले. ओबीसी उपोषणाचा हा जो विषय आहे. तो कोणत्याही पक्षाने राजकीय करू नये, सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन दोन्ही बाजू समजून घेऊन यामध्ये मार्ग काढला पाहिजे. ही बैठक निवडणुकीत कोणी काय केले यासाठी नव्हती. जे झालं ते झाले. जनादेश आम्ही स्वीकारला आहे. पुढच्या विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कामाला लागलो आहोत, असेही दानवे म्हणाले.

जनतेनेच निवडणूक हातात घेतली होती

अशोक चव्हाण (Ashok Chavan) आमच्यासोबत आले म्हणून आमचे नुकसानही झाले नाही. अशोक चव्हाण नसते तरी हीच परिस्थिती असती असे माझे मत आहे. हा एका मतदारसंघाचा विषय नाही. अशोक चव्हाण यांचा यामध्ये काहीच दोष आहे, असे मी मानत नाही. त्यांच्या येण्याचा किंवा जाण्याचा दोष देता येत नाही. अशोक चव्हाण आल्यामुळे तोटा झाला असेही म्हणत नाही. आम्ही अशोक चव्हाण आल्यामुळे फायदा झाला असेही म्हणत नाही आम्ही. आमचे स्पष्ट मत आहे की जनतेनेच निवडणूक हातात घेतली होती.

शनिवारी मी आणि विखे पाटील दोघे एकत्रित येणार होतो. मात्र, अचानक मुख्यमंत्र्यांचा दौरा त्यांच्या मतदारसंघात लागल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. अशोक चव्हाण यांनी मला काल फोन केला होता. त्यांचे मुंबईला ठरलेले कार्यक्रम आहेत, त्यामुळे ते या बैठकीला आले नाहीत असे दानवेंनी स्पष्ट केले.

पराभवाला एक कारण नसते. ही निवडणूक मतदाराने हातात घेतली आहे. त्यांनी ठरवलं कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाचा पराभव करायचा. मी ज्या मतदारसंघाचा खासदार आहे तिथे विरोधी पक्षात असताना पंचवीस वर्षे जिल्हा परिषद आमच्या ताब्यात होती. मी 45 वर्षांपासून राजकारणात आहे. 26 निवडणुका लढवल्या आहेत. जे प्रस्थ तुम्ही इथे अशोकराव चव्हाण यांचे सांगतात ते प्रस्थ माझं तिथेही होते. तिथे माझा पराभव झाला मग तुम्ही असं विचारायचं का ? तुमचा पराभव कसा झाला, जनादेश आहे.

लोकांनी निवडणूक हाती घेतली होती. भाजप जमिनीवरच आहे. हवा बदलत असते लोकसभेच्या निवडणुकीला जे घडलं ते विधानसभेच्या निवडणुकीत घडेल असे नसते. पीएम मोदी (Narendra Modi) यांची जादू बिलकुल कमी झाली नाही, देशात पंडित नेहरूनंतर तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले आहेत. एकनाथ खडसे वरिष्ठांना भेटले ही आनंदाची गोष्ट आहे, असल्याचे यावेळी दानवेंनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT