Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे विधानसभेच्या आखाड्यात उतरून अब्दुल सत्तारांचा वचपा काढणार?

Abdul Sattar- Raosaheb Danve News : सत्तार यांनी उघडपणे दानवे यांच्याविरोधात काम करत काँग्रेसच्या कल्याण काळे यांना मदत केल्याचे कबूल केले.
Abdul Sattar- Raosaheb Danve
Abdul Sattar- Raosaheb Danve Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात दिग्गजांचा पराभव झाला. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा लोकसभेच्या जालना मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेले रावसाहेब दानवे यांचा त्यात समावेश आहे. शंभर टक्के निवडून येण्याची खात्री असणारी जालन्याची जागा एक लाखाच्या वर मतांनी पडली. या पराभवानंतर सध्या रावसाहेब दानवे यांनी जिल्हाभरात आभार दौरा सुरु केला आहे.

यातून ते विरोधकांना सूचक इशारे देत आहेत. गेल्या तीस-पसत्तीस वर्षापासून रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) व सिल्लोड-सोयगावचे आमदार तथा राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील मैत्री या निवडणुकीत तुटली. सत्तार यांनी उघडपणे दानवे यांच्याविरोधात काम करत काँग्रेसच्या कल्याण काळे यांना मदत केल्याचे कबूल केले.

Abdul Sattar- Raosaheb Danve
Ashok Chavan News : निवडणुकीमध्ये हार-जीत होते, आम्ही कमी पडलो; अशोक चव्हाणांनी सांगितले पराभवाचे कारण

रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांच्यामुळे आपण निवडणुकीत पराभूत झालो याचा इनकार करतांना मला जनतेने पाडले, असे म्हणत तूर्तास कोणालाही अंगावर न घेण्याची सावध भूमिका घेतली आहे.

भोकरदन येथील कालच्या आभार दौऱ्यात रावसाहेब दानवे यांनी आक्रमक भाषण करत आपण मागच्या दाराने कोणते पद मिळवणार नसल्याचे जाहीर केले. 'शेर हमेशा आगे के दरवाजेसे आता है', असा सूचक इशारा त्यांनी देत पराभवाने खचलेल्या समर्थकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

दानवे यांनी विधान परिषद, राज्यसभेवर जाणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे ते पुन्हा विधानसभा लढवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करतांना दानवे यांनी मी जर मैदानात उतरलो तर सत्तारांची झाकी उतरवून टाकेल, असा इशारा याआधीच दिला होता.

एवढेच नाही तर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यामुळे सिल्लोड पाकिस्तान बनले आहे, त्यांनी जमिनी हडपल्या, नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना प्रचंड त्रास दिला जात आहे, अशा आरोपांचा भडिमार करत दानवे यांनी सत्तार यांच्याविरोधात मोहिम छेडल्याचे दिसून आले.

Abdul Sattar- Raosaheb Danve
Jaidatta Kshirsagar Vs Sandeep Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत येणार? संदीप क्षीरसागरांनी केला मोठा दावा

आता सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातून दानवे स्वतः अब्दुल सत्तारांच्या विरोधात मैदानात उतरून त्यांचा निवडणुकीत वचपा काढणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रावसाहेब दानवे यांचे राजकाण ज्यांनी जवळून पाहिले आहे, त्यांना याची चाहूल लागली आहे.

मागच्या दाराने पद घेणार नाही, असे सांगणारे दानवे विधानसभेच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होतात का? हे येणार्‍या काही महिन्यात स्पष्ट होईल. दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी मात्र विधानसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com