Raosaheb Danve On Thackeray News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve On Thackeray News : उद्धव-राज ठाकरे एकत्र आले तरी त्यांचा आमच्यासमोर निभाव लागणार नाही!

Danve says that even if Raj and Uddhav Thackeray unite, they won't be able to stand against the BJP. : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आज भाजपामध्ये प्रवेश होत आहे. रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने आणि सल्ल्यानेच गोरंट्याल यांनी हातात कमळ घेतले आहे.

Jagdish Pansare

Marathwada Politics : उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले, जे कधी एकमेकांच नाव सुद्धा काढत नव्हते ते आज सोबत येत आहेत. ही हातमिळवणी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असली तरी मतदार एकच आहे. भाजपा आणि मित्रपक्षांसमोर दोन्ही ठाकरेंचा निभाव लागणार नाही, असा दावा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. विरोधी पक्षात आता कोणालाच राहायचे नाही, म्हणून ते भाजपात येत आहेत, असेही दानवे म्हणाले.

काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आज भाजपामध्ये प्रवेश होत आहे. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या पुढाकाराने आणि सल्ल्यानेच गोरंट्याल यांनी हातात कमळ घेतले आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावरही भाष्य केले. कोणाचा पक्ष फोडण्याचे भाजपाचे धोरण नाही. आमचा पक्ष हाच एक परिवार आहे, इतर पक्ष हे परिवारांचे आहेत, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणालाच विरोधी पक्षात राहण्याची इच्छा राहिलेली नाही. विरोधी पक्षात जीवच उरला नसल्याने त्यांचे नेते, पदाधिकारी भाजपा (BJP) नाही तर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जात आहेत. संपूर्ण हयात ज्या पक्षात घालवली त्या पक्षाचे विचार जर पटत नसतील आणि पंतप्रधान यांचे नेतृत्व, त्याची विचारधारा जर कोणाला आकर्षित करत असेल आणि त्यातून ते आमच्या पक्षात येत असतील तर यात वावगं काय? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला.

जे लोक भाजपामध्ये येत आहे, त्यांना भाजपाची विचारधारा, ध्येय धोरण आणि शिकवण हे पाहूनच आपली पुढची दिशा ठरवावी लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोक आमच्या पक्षात येत असल्याचा दावा दानवे यांनी केला. विरोधी पक्ष हा वैफल्यग्रस्त झाला आहे, त्यांना हात वर करून मित्र शोधावे लागत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

ज्या राज ठाकरे यांच नाव कधी उद्धव ठाकरे काढत नव्हते, आज त्यांच्याशीच हातमिळवणी करण्याची वेळ त्यांच्यावर का आली? मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जर हे दोन भाऊ एकत्र आले असतील तर त्यांचा महायुतीसमोर निभाव लागणार नाही, याचा पुनरुच्चार रावसाहेब दानवे यांनी केला. जालना नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत झाल्यानंतर होऊ घातलेल्या पहिल्याच निवडणुकीसाठी दानवे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. तीन टर्म आमदार असलेल्या काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना भाजपामध्ये आणत दानवे यांनी आपल्या पक्षाता महापौर करण्याच्या दिशेने पहिले पाऊलं टाकल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT