Uddhav-Raj Thackeray: "उद्धव-राज एकत्र आले तरी ॲडजेस्ट कोण करणार? पुन्हा वाद उफाळणार का?"

Uddhav-Raj Thackeray: राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दोन्ही ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याबाबत सवाल उपस्थित केला आहे.
Raj Thackeray and Uddhav Thackeray
Raj Thackeray and Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Raj Thackeray: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेची निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू युती करणार असलाचा अंदाज बांधला जात आहे. दोघा भावांच्या वाढत्या गाठीभेटीमुळं अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. भाजपसह सर्व पक्ष याकडं लक्ष ठेवून आहेत. एकेकाळचे शिवसैनिक आणि आणि शिंदे सेनेच्या मंत्रिमंडळात असलेले राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दोघेही भाऊ एकत्र आले तरी ॲडजेस्टमेंटवरून पुन्हा वाद उफाळणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Nishikant Dubey: लोकसभेत निशिकांत दुबे यांचा वर्षा गायकवाडांवर निशाणा; म्हणाले, लॉबीतल्या चर्चेची बातमी बनवून....

जयस्वाल पाच टर्मचे आमदार आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात जयस्वाल यांनीच शिवसेनेला खाते उघडून दिले होते. अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते सुद्धा गेले. पुन्हा निवडणूक आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. गडचिरोली जिल्ह्याचे ते सहपालकमंत्री आहेत. सुमारे पंचवीस वर्षांपासून शिवसेना आणि उद्धव व राज ठाकरे यांच्या कामाचा व कार्यशैलीचा त्यांना चांगलाच अनुभव आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Fact Check: ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचे 250 जवान शहीद झाल्याचा दावा खरा की खोटा! लष्कप्रमुखांच्या 'त्या' व्हिडिओबाबत झाला महत्वाचा खुलासा

दरम्यान, दोन्ही बंधू एकत्र आल्यास काय राजकीय परिणाम होईल? अशी विचारणा केली असता जयस्वाल म्हणाले, ते अद्याप एकत्र आले नाहीत. उद्धव व राज ठाकरे यापैकी कोणीच तडजोड करीत नाहीत. त्यामुळे दोघे भाऊ वेगवेगळे झाले होते. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच थोडी लवचिकता दाखवली असती किंवा सामंजस्याची भूमिका घेतली असती तर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले नसते. आता एखाद्या निवडणुकीसाठी ते एकत्र आले तरी त्यांची भूमिका एकच राहील, एकमेकांना सांभाळून घेतले जाईल असे वाटत नाही. शेवटी तो त्यांचा निर्णय आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Amit Shah: नेहरुंच्या डोक्यावरही केस नव्हते मग....; अमित शहांनी सांगितला चीन युद्धावेळचा किस्सा

राज्यात महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबतच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीला मतविभाजानाचा धोका नाही असे सांगून त्यांनी ठोकरे बंधूंच्या युतीने भाजप महायुतील फरक पडणार नसल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com