Ravindra Waikar, shivsena melava  sarkarnama
मराठवाडा

Ravindra Waikar News : ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या! आमदाराचे चॅलेंज

Roshan More

बा.पु.गायकर

loha : ईव्हीएमवर संशय व्यक्त करत शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भाजपला बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे चॅलेंज केले होते. आता ठाकरे गटाचे दुसरे नेते, माजी मंत्री, रवींद्र वायकर यांनी देखील "इतरही देशात आजही बॅलेट पेपर वरती मतदान प्रक्रिया पार पडते ; मग आपल्या देशात का नको ? ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवरती मतदान व्हायला पाहिजे." असे म्हटले आहे.

लोहा कंधार मतदारसंघातील शिवसेनेचा निर्धार मेळावा (ता. २८) पारडी येथील विक्की मंगल कार्यालयात पार पडला. त्यावेळी वायकर यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. मी माझ्या माणसांना भेटायला आलो आहे. यात कसले राजकारण ? आम्ही पक्ष प्रमुखांसह मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते आहोत. केंद्र सरकार देशातील लोकशाही संपवू पाहत आहे. आपण सर्वांनी जागृत असायला हवे, असे रवींद्र वायकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निर्धार मेळाव्यास संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राज्य संघटक एकनाथ पवार, माजी आमदार रोहिदास चव्हाण, सहसंपर्कप्रमुख दता पाटील कोकाटे, भुजंग पाटील डक, जिल्हासंघटक नेताजी भोसले, मुक्तेश्वर धोंडगे, जिल्हाप्रमुख माधव पावडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वच्छला पुयड, उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, माजी जिल्हा परिषद सदस्य जनाबाई नाकाडे, माजी पंचायत समिती सभापती सतीश पाटील उमरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल शेटकर, बालाजी परदेशी, बाजार समितीचे संचालक साहेबराव काळे, सुरेश पाटील हिलाल आदी उपस्थिती होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खोके घेवून गेलेले चाळीस आमदारपैकी केवळ चार जण निवडून आले तरी त्यांचा जाहीर सत्कार करीन, असा टोला रवींद्र वायकर यांनी लगावला. शिवसेनेने कार्यातून आपुलकीचे नाते जपत जनतेचा विश्वास संपादन केला. भाजप आणि बंडखोर सेनेला धडा शिकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे. शिवसैनिकानी ऊर्जा कमी होऊ देवू नका, लोहा कंधार विधानसभा जिंकण्यासाठी शिवसैनिकाने जिद्दीने कामाला लागावे, असे आवाहन वायकर यांनी केले.

...आणि मेळावा झाला

सकल मराठा समाजाच्या वतीने या मेळाव्यास विरोध करण्याच्या पोस्ट सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे निर्धार मेळावा होणार की नाही, यावर शंका करण्यात येत होती. पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे शिवसेनेचा निर्धार मेळावा शांततेत पार पडला.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT