Abdul Sattar, Sandipan Bhumre Sarakarnama
मराठवाडा

Phulambri Assembly Constituency : सत्तारांचे लाडके बलांडेंची माघार, भुमरेंचे शिलेदार पवारांची बंडखोरी..

Rebellion of Shiv Sena District Chief in Phulumbri Constituency : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांची मनधरणी करण्यात महायुतीला यश आले नाही. त्यामुळे रमेश पवार आता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांचे पाठबळ असलेले शिवसेनेचे किशोर बलांडे यांनी मात्र माघार घेत सर्वांनाच धक्का दिला.

Jagdish Pansare

नवनाथ इधाटे

Maharashtra Assembly Election 2024 : फुलंब्री विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट आला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या किशोर बलांडे आणि जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी अधिकृत उमेदवार भाजपच्या अनुराधा चव्हाण यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी मंत्री अब्दुल सत्तार यांचे लाडके म्हणून ओळख असलेल्या किशोर बलांडे यांनी माघार घेतली आहे. तर दुसरीकडे संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी मात्र बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाल्याने महाविकास आघाडीच्या गोटात मात्र आनंदाचे वातावरण आहे. कारण विलास औताडे यांच्याविरोधात उमेदवारी दाखल केलेल्या जालन्याचे खासदार कल्याण काळे यांचे बंधु जगन्नाथ काळे यांनी मात्र माघार घेतली आहे. (Abdul Sattar) त्यामुळे महायुतीच्या अनुराधा चव्हाण, महाविकास आघाडीचे विलास औताडे, शिवसेनेचे बंडखोर रमेश पवार आणि लोकसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखविणारे मंगेश साबळे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांची मनधरणी करण्यात महायुतीला यश आले नाही. त्यामुळे रमेश पवार आता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांचे पाठबळ असलेले शिवसेनेचे किशोर बलांडे यांनी मात्र माघार घेत सर्वांनाच धक्का दिला. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानूसार आपण माघार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महायुती प्रमाणेच महाविकास आघाडीत बंडखोरीचा प्रयत्न झाला होता. खासदार कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज होते.

महाविकास आघाडी कडून विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जगन्नाथ काळे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना समजाविण्यात खासदारांना यश आले. त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेत विलास औताडे यांच्या विजयासाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे. (Shivsena) जालना लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत पावणे दोन लाख मतांपर्यंत मजल मारणाऱ्या मंगेश साबळे पाटील यांनी फुलंब्री विधानसभा निवडणुकीतील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

लोकसभा निवडणुकीत साबळे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुती सरकारच्या विरोधात असलेल्या नाराजीचा फायदा झाला होता. मंगेश साबळे यांनी पावणे दोन लाख मते घेतल्यामुळे रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला होता. मात्र आज मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुक लढवण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही साबळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आता फुलंब्री विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार आहे.

तर जरांगे पाटील यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनेक उमेदवारांनी त्यांच्या आवाहनानूसार अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये किशोर बलांडे, प्रदीप पाटील, जगन्नाथ काळे, राजेंद्र पाथ्रीकर, सुधाकर शिंदे, बाबासाहेब डांगे, गणेश मोठे, गणेश काळे, बाबासाहेब म्हस्के, साईनाथ चौथे, सुदाम मते, आकाश साळुंखे, संभाजी शेजुळ यांच्यासह आदींनी माघार घेतली. महाराष्ट्रमध्ये भाजप - शिवसेना व मित्र पक्षांची महायुती असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

शेवटच्या दिवशी त्यांचा स्थानिक नेत्यांनी शोध घेतला. परंतु रमेश पवार हे नॉट रीचेबल असल्यामुळे त्यांना समजाविण्यात महायुतीच्या नेत्यांना अपयश आले. त्यामुळे आता शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बंडखोरी कायम असून रमेश पवार आता निवडणुकीला सामोरे जाणार आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काय कारवाई केली जाते? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT