BJP News : शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे व त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे असलेल्या दीडशे कोटींच्या जमिनीचे प्रकरण राज्यभरात गाजत आहे. अशातच या प्रकरणात महसूल विभागाकडून याची चौकशी केली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. हिबानामाद्वारे सालारजंगच्या नातेवाईकांनी शहरातील मोक्याच्या जागेवरची जमीन संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या चालकाच्या नावे केल्याचे प्रकरण समोर आले होते.
या जमीन प्रकरणावरून विरोधकांनी भुमरे पिता-पुत्रांना लक्ष केले होते. तर या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसल्याच्या खुलासा संदीपान भुमरे, विलास भुमरे यांनी केला होता. या संदर्भात गुरुवारी (ता.7) चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता त्यांनी या जमीनीची महसूल विभागाकडून चौकशी करणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
तसेच कुणीघरासाठी खोदकाम केले, मुरूम काढल्यानंतर महसूल अधिकारी त्रास देण्यासह लाखोपासून कोट्यवधी रुपयांचा दंड लावतात. याबाबत पत्र काढले असून कुठलाही दंड लागणार नाही. याचे पालन करावे लागेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महसूल प्रशासनाच्या बेलगामपणाला लगाम लागणार आहे. घरकाम करण्यासाठी अंडरग्राऊंडसाठी खोदकाम केल्यास तलाठ्यांपासून मंडळाधिकारी ते तहसिलदारांपर्यंत सगळी यंत्रणा परवानगी घेऊन बांधकाम करणाऱ्यांवर कारवाईचा ससेमिरा पाठीशी लावते.
संबंधितांना त्रास देण्याची कुठलीही संधी महसूल यंत्रणा सोडत नाही. त्यामुळे शासनाने प्रशासनातील यंत्रणेला लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आली की, ईव्हीएम बिघडते आणि विरोधक जिंकले की ईव्हीएम चांगले ठरते,अशी विरोधकांची भूमिका आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे कुणीही उरले नाही.
मुंबई महापालिका हातातून जाण्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे कार्यकर्ते थांबवायचे पवारांचे प्रयत्न सुरु आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस व शिंदे यांच्यात रोज चर्चा होतात. दिल्लीत एनडीएचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांना भेटतात. शिंदे यांचा दिल्ली दौरा एनडीए नेता म्हणून झाला, असेही शिंदे-शहा भेटीवर बावनकुळे म्हणाले.
ठाकरे यांच्यात आम्हाला सळो की पळो करण्याची क्षमता नाही, असा टोला लगावतानाच बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केले. कर्जमाफी योग्य व्हावी, फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको. खरे शेतकरी आम्ही शोधतोय,त्याचे सर्वेक्षण सुरु आहे.
अनेक शेतकरी असे निघतील ज्यांना कर्जमाफीची गरज नाही. लाडकी बहीण बाबत तपासणी गरजेची असून चुकीच्या अर्जांची तपासणी होत आहे. ही योजना आर्थिक दुर्बलांसाठी असून या निकषात न बसणारे लाभार्थी स्वतःहून बाजूला व्हावेत. या योजनेत 2100 रूपये लवकरच देऊ, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.