Rohit Pawar ED Enquiry  Sarkarnama
मराठवाडा

Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांच्या 'ED' चौकशीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, बीडमध्ये शरद पवार गटाचं जोरदार आंदोलन

Datta Deshmukh

Beed NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची अ‍ॅग्रो कंपनीच्या संदर्भात ईडी चौकशी काल (गुरूवारी) सुरु होती. त्यांना दुसऱ्यांदा या चौकशीसाठी बोलावण्यात आलं होत. यापूर्वी 24 जानेवारीलाही रोहित पवारांची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती.

रोहित पवार यांची ईडीमार्फत होणारी चौकशी सुडाच्या भावनेतून असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी बीडमध्ये जोरदार निदर्शने केली. या कारवाई विरोधात राज्यभर रोहित पवार यांचे समर्थक आंदोलन करत आहेत.'विजयापर्यंत संघर्ष करु, अन्यायाला पुरुन उरु,' अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. Rohit Pawar ED investigation 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष, आमदार संदीप क्षीरसागर, सुशिला मोराळे, मदन जाधव, अर्जुन क्षीरसागर, के. के. वडमारे आदींसह पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन नंतर निवेदन देण्यात आले. तसेच, कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Rohit Pawar NCP News)

रोहित पवार केवळ मतदार संघातीलच नाही तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे आक्रमकपणे मांडत आहेत. आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाईही ते लढत आहे. यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. (Sharad Pawar NCP Group)

यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा उगारून पाहिला. तरीही आमदार रोहित पवार यांनी या कारवाईला जुमानले नाही. रोहित पवार (Rohit Pawar) यांची चौकशी राज्य सहकारी बँकेच्या प्रकारणावरून केली जात आहे. मात्र, राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांतील अनेकजण आज भाजपमध्ये किंवा अजित पवार गटामध्ये किंवा शिंदे गटामध्ये आहेत.

त्यात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडित, सुनील फुंदे, नितीन पाटील, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डीकर, शेखर निकम, विजयसिंह मोहिते पाटील, राजन तेली, दिलीप सोपल, आनंदराव अडसूळ, धनंजय दलाल यांचा समावेश आहे. मात्र, रोहित पवारांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी राज्यभर काढलेल्या युवा संघर्ष यात्रेला प्रतिसाद भेटल्याने महायुती सरकार घाबरले आहे. भाजपकडून सुडाने कारवाई केली जात असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले.

SCROLL FOR NEXT