Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांची तब्बल आठ तास चौकशी; 'या' दिवशी पुन्हा ईडीने बोलावले

NCP Sharad Pawar : संघर्ष यात्रेत उपस्थित केलेल्या जनसामान्यांच्या प्रश्नांवरून सरकारमध्ये रोष असल्याचा पवारांचा दावा
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : बारामती अॅग्रो कंपनीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांची गुरुवारी दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी झाली. यावेळी पवारांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर बाहेर पडलेल्या रोहित पवारांचे कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, पवारांना पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार मुंबईत उपस्थित होते.

रोहित पवारांची (Rohit Pawar) 24 जानेवारी रोजी ईडीने पहिल्यांदा चौकशी केली होती. त्यावेळी 12 तास चाललेल्या चौकशीत पवारांनी अधिकाऱ्यांना सहकार्य केले होते. त्यावेळीच त्यांना 1फेब्रुवारीला दुसऱ्या चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आता 8 फेब्रुवारीनंतर पुन्हा चौकशीला बोलावू, असे ईडीकडून सांगण्याची आल्याची माहिती रोहित पवारांनी दिली. दरम्यान, चौकशीनंतर बाहेर आलेल्या पवारांचे कार्यकर्यांनी जल्लोषात स्वागत केले. तर आम्ही सर्व आव्हानांना तोंड देण्यास तयार असल्याचा एल्गारही पवारांनी केला.

Rohit Pawar
Congress Leader Statement: काँग्रेसच्या खासदाराचे वादग्रस्त विधान; म्हणाले,'दक्षिण भारताला स्वतंत्र देश जाहीर करा'

आता सुरू असलेल्या चौकशीबाबत रोहित पवार म्हणाले, 'मुंबईत जणू काय सोन्याचा हंडा लपवला गेला आहे. तो कथित हंडा शोधण्याचे काम ईडीच्या माध्यमातून काही लोक करत आहेत. या चौकशीमुळे आम्ही घाबरलो नाही. जाणारे गेले, मात्र मराठी माणूस कधीही पळून जात नाही, हे आम्हाला दाखवायचे आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जोरदारपणे लढायचे आहे. तसेस राज्यात जनसामान्याचे सरकार आणण्यासाठी जोमाने कामाला लागावे लागणार आहे,' असे आवाहनही यावेळी रोहित पवारांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. दुसऱ्यांदा चौकशी झाल्यानंतर ८ फेब्रुवारीनंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. एकीकडे चौकशी सुरु असताना दुसरीकडे त्यांच्या समर्थकांकडून राष्ट्रवादी (NCP) कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला.

Rohit Pawar
OBC Reservation : उमरग्यात तब्बल 34 वर्षांनी ओबीसी समाज रस्त्यावर; मराठा आरक्षणाबाबत मोठी मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com