Rohit Pawar ED investigation : रोहित पवार ED चौकशीच्या फेऱ्यात अन् कार्यकर्ते ठिय्या आंदोलनात!

NCP workers Protest : पोलिसांनी नोटीस बजावल्याने कार्यकर्ते अधिकच आक्रमक
Rohit Pawar ED investigation
Rohit Pawar ED investigationSarkarnama
Published on
Updated on

Mumbai NCP News : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. गेल्या 7-8 तासांपासून रोहित पवारांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. एकीकडे त्यांची चौकशी सुरु आहे आणि दुसरीकडे त्यांच्या समर्थकांकडून राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले जात आहे. चटया आणि कापडावर बसून कार्यकर्ते या कारवाईवरून सरकारचा निषेध करत आहेत.

रोहित पवार(Rohit Pawar) यांची अ‍ॅग्रो कंपनीच्या संदर्भात ईडी चौकशी सुरु आहे. दुसऱ्यांदा त्यांना या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 24 तारखेला जेव्हा त्यांना बोलावलं होतं, तेव्हाही मोठ्या संख्येत कार्यकर्ते जमले होते आणि घोषणाबाजी सुरु होती. मात्र यंदा पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे रोहित पवार यांचे समर्थक आंदोलन करत आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबई इथल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मात्र जोपर्यंत चौकशी पूर्ण होतं नाही तो पर्यंत इथून हलणार नाही असा निर्धार केला आहे. त्यांच्या मतदार संघातील समर्थक त्यांना समर्थन देण्यासाठी मुंबई राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar ED investigation
Rohit Pawar ED Inquiry : शरद पवार आणि रोहित पवारांबद्दल भाजप नेत्याचे मोठे विधान

महाविकास आघाडीतील(Mahavikas Aghadi) नेत्यांवर सध्या ईडीचं धाडसत्र सुरु आहे. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, सुरज चव्हाण यांना आधीच ईडीने अटक केली आहे आणि आता रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे. एकंदरीत मविआ नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. या सगळ्या कारवाया जाणूनबुजून सुरु असल्याचा दावा विरोधी पक्षाकडून केला जात आहेत आणि या सगळ्या कारवाया महाविकास आघाडीचे जे नेते महायुतीत सामील होतं नाहीत, त्यांच्यावर होत असल्याचा आरोप केला जात आहे.

वारसा विचारांचा मार्ग संघर्षाचा -

राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर अशाच आशयचे बॅनर लावली गेली आहेत. वारसा विचारांचा आणि मार्ग संघर्षाचा असं या बॅनरवर लिहीण्यात आलं आहे. यावर तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे फोटो आहेत. महाविकास आघाडी विचारांचा वारसा घेऊन पुढे जात असल्याचं नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र संघर्ष ही आमच्याच वाट्याला जाणूनबुजून दिला जात असल्याचं देखील नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकजूट दाखवण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले आहेत.

Rohit Pawar ED investigation
Shikhar Bank Scam Update: अजित पवारांना शिखर बँक घोटाळाप्रकरणी मोठा दिलासा; दुसऱ्यांदा 'क्लोजर रिपोर्ट'

रोहित पवार यांना जेव्हा 24 जानेवारीला ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं त्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी ईडी कार्यालयाचा परिसर आणि राष्ट्रवादी कार्यालयच्या परिसरात जमले होते. मात्र आता पोलिसांनी थेट या आंदोलनकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शांततेत आंदोलन करणार असूनही त्यांना नोटीस बजावली जात आहे. असा आरोप कार्यकर्ते करत आहेत आणि देशात आणि महाराष्ट्रात लोकशाही आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.

जर लोकशाही असेल आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि राज्यात शिंदे सरकारने हुकूमशाही जाहीर केली नसेल, तर आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आम्ही आमच्या कार्यालयाबाहेर आणि ईडी कार्यालयाबाहेर देखील जाऊन आंदोलनाला बसू शकतो. असं विद्या चव्हाण यांनी पत्रकारपरिषद घेत म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com