Chhatarapati Sambhajinagar : खासदार इम्तियाज जलील (Imitaz Jalil) हे राम मंदीर वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, ही चुकीची माहिती आहे. रामनवमीच्या आदल्या रात्री ११ वाजता परस्पर दोन गटातील तरुणांमध्ये वाद, घोषणाबाजी झाली तो वाद तेव्हाच मिटला. त्यानंतर रात्री दीड वाजेनंतर आपसातील दोन गटातील लोकांमुळे किराडपुऱ्यात दंगल झाली. त्यामुळे याला हिंदू-मुस्लीम दंगल म्हणता येणार नाही.
तसेच, खासदार इम्तियाज जलील हे राम मंदीर वाचवायला नाही तर, जमावापासून स्वत:ला वाचवण्यासाठी मंदिरात गेले होते, असा आरोप (Shivsena) शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केला. सकल हिंदू एकीकरण समितीतर्फे मंगळवारी (ता. ४) पत्रकार परिषद घेण्यात आली. (Marathwada) यावेळी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील, भाजप नगरसेवक शिवाजी दांडगे, मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर आदींची उपस्थिती होती.
जंजाळ म्हणाले, जिवाची बाजी लावत दंगल थोपवणाऱ्या पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांचे अभिनंदन करतो. त्यात गिते जखमी झाल्या आहेत, महिला अधिकाऱ्यांवर हात उचलणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करतो. मागे राजाबाजार, आता किराडपुरा दंगलीतही पोलीसच टार्गेट केले गेले. दंगेखोरांनी पोलीस गाडी सुरु करुन एक्सीलेटरवर दगड ठेवला. त्यानंतर डिझेलच्या टाकीचे झाकण उघडून गाडी पेटवून दिली.
आम्हाला पोलिसांच्या कामावर शंका नाही. पण, खासदार म्हणतायेत कि, हिंदूवर गुन्हे दाखल करा. तिथे हिंदु नव्हतेच तर, गुन्हे कुणावर दाखल करणार? इम्तियाज जलील हे पोलिसांवर दबाव आणत आहेत. इम्तियाज यांना जमाव दगड मारायला लागले, म्हणून ते राम मंदीर परिसरातील पोलीस चौकीत पळाले. तसेच राम मंदीर पोलिसांनी वाचवले, इम्तियाज यांनी नाही, असा दावाही जंजाळ यांनी केला.
दंगलीदरम्यान इम्तियाज यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दही जंजाळ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही मंदिरात काय करताय ? तिथे काय झालय? हे मी विचारले तर, ते म्हणाले, मंदिराला धक्का नाही. मात्र बाहेर दंगल सुरु आहे. मागच्यावेळी अतिक्रमण काढले होते त्यावेळी राजाबाजार-शहागंज येथे दंगल झाली होती. आताही अतिक्रमण मोहीम सुरु झाली तर, किराडपुरा येथे दंगल झाली. याबाबीही पोलिसांनी तपासून पहाव्यात.
तसेच दंगलखोरांना आवरण्यासाठी पोलिसांच्या `वज्र` द्वारे रंग वापरायची गरज होती. सोबत पोलीस बंदोबस्त वाढवणे, आधुनिक यंत्रणा वापरणे, एसआरपीएफ तुकड्या कायमस्वरुपी देण्याची मागणी यावेळी जंजाळ यांनी केले. तर मनसेचे खांबेकर म्हणाले, पोलीस कारवाईनंतर लक्षात येते कि, ही राजकीय लोकांनी घडवलेली ही दंगल आहे. दंगलीतील `पीएफआय` चा संबंध स्पष्ट करावा.
पाटील म्हणाले, ‘मंदिरात आश्रय घेण्यासाठी ते आले होते का? इम्तियाज यांनी आधी आवाहन केले, नंतर आव आणला. पहाटे पावणेचार वाजेपर्यंत त्यांचे ११ व्हिडिओ पडले, तोपर्यंत मी राम मंदीर वाचवतो, असे ते का म्हणाले नाहीत.’ असा प्रश्न उपस्थित केला. दांडगे यांनी दंगलखोरांवर कडक कारवाईची मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.