Sambhaji Nagar 
मराठवाडा

Sambhaji Nagar: महापालिकेचं कामकाज सुरु होण्यापूर्वीच नगरसेवकांविरोधात तक्रारी; संभाजीनगरमध्ये काय सुरुए?

महापालिका निवडणुकीत विजयी झाल्याबद्दलचा नवनिर्वाचित नगरसेवकांचा एकीकडे सत्कार सुरू असताना दुसरीकडे तक्रारी सुरू झाल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

माधव इतबारे

Chhatrapati Sambhaji Nagar news: तब्बल दहा वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या कसेबसे पक्षाकडून तिकीट मिळवले. विरोधक पक्षांतर्गत गटबाजी नाराजीचा सामना करत विजयश्री खेचून आणली. महापालिकेचे सुसज्ज आणि चकचकीत सभागृह नव्या नगरसेवकांची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतू सभागृहात येण्यापूर्वीच काही नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी सुरू झाल्या आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या तिसऱ्या अपत्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधक ॲक्टिव झाले असून त्यांनी अशा नगरसेवकांचा शोध घेत त्यांच्या विरोधात तक्रारींचा सूर आळवायला सुरुवात केली आहे.

महापालिका निवडणुकीत विजयी झाल्याबद्दलचा नवनिर्वाचित नगरसेवकांचा एकीकडे सत्कार सुरू असताना दुसरीकडे तक्रारी सुरू झाल्या आहेत. तिसऱ्या अपत्याबद्दल या तक्रारी असल्याचे समोर आले आहे. विजयाचा अंगावरचा गुलाल अद्याप निघालेला नसताना नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी सुरू झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. अनेक उमेदवार निवडणूक प्रक्रिया तसेच विरोधातील नगरसेवकांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची शक्यता गृहीत धरून कागदपत्र, निवडणुकीचे रेकॉर्ड तयार ठेवण्याच्या सूचना प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महापालिकेची तब्बल 10 वर्षांनंतर निवडणूक झाली. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली. त्यात अनेकांनी काठावर तर अनेकांनी दणदणीत विजय मिळविला. आठ-दहा दिवसांत महापौरपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. सध्या नवनिर्वाचित नगरसेवक हारतुरे स्वीकारण्यात मग्न आहेत, तर दुसरीकडे नव्या नगरसेवकांच्या विरोधात तक्रारीही सुरू झाल्या आहेत.

नियमानुसार नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्यांना तिसरे अपत्य असेल तर निवडणूक लढविता येत नाही. असे असेल तरी अनेक जण दोन अपत्यांचे शपथपत्र देऊन निवडणूक लढवितात. त्यांच्याविरोधात तक्रारी आल्यानंतर चौकशीअंती तिसरे अपत्य सिद्ध झाल्यास संबंधिताला आपले पद गमवावे लागते. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी सुरू झाल्या आहेत. प्रशासक जी. श्रीकांत यांनी त्याला पुष्टी दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे तयार ठेवण्याचे आदेश दिले.

उमेदवारांना द्यावा लागणार हिशोब

महापालिका निवडणुकीत 859 उमेदवार रिंगणात होते. या सर्वांना खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांनी महिनाभरात हिशेब दिला नाही, तर त्यांचे नगरसेवकपद रद्द होईल. जे उमेदवार हिशेब सादर करणार नाहीत, त्यांच्यावर देखील सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, अशी कारवाई होऊ शकते, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT