Sambhajiraje Chhatrapati News Sarkarnama
मराठवाडा

Beed Crime News : देशमुख खून प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत 'त्या' नेत्याला मंत्रीपद देऊ नये..

Sambhajiraje Chhatrapati says, till then, that leader should not be given a ministerial post : शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात इतकी क्रूर हत्या होऊ शकते, यावर विश्‍वास बसत नाही. आपण शिवरायांचे वंशज आहोत, शिवरायांनी सर्व जाती धर्मांतील लोकांना सोबत घेतले.

Jagdish Pansare

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष (Beed News) देशमुख खून प्रकरणाने संपुर्ण राज्य हादरून गेले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एवढ्या क्रूरपणे हत्या होऊ शकते? यावर विश्वासच बसत नाही, असा संताप माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. तसेच या खूनाचा तपास पुर्ण होईपर्यंत संबंधित नेत्याला मंत्रीपद देऊ नका, अशी मागणीही त्यांनी केली.

संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आज मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत खूनाच्या तपासासाठी एसआयटी स्थानप करण्याची मागणी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी (ता. 9) अपहरण करुन खून करण्यात आला. या प्रकरणात सात आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संशयितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटेचाही समावेश आहे. दरम्यान, शनिवारी (ता. 14) संभाजीराजे छत्रपती व पॅंथर सेनेचे दिपक केदार यांनी मस्साजोगला भेट देऊन देशमुख कुटूंबियांचे सांत्वन केले. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांकडे या खून प्रकरणावर भाष्य केले.

घटनेनंतर केज पोलिसांनी तीन तास विलंब केला. या प्रकरणात पोलीसांची भूमिका संशयास्पद वाटते. त्यामुळे केजच्या पोलिस निरीक्षकांना सहआरोपी केले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. याबाबत आपण विशेष पोलिस महानिरीक्षक मिश्रा यांना विचारले तर त्यांनाही काही सांगता आले नाही.

शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात इतकी क्रूर हत्या होऊ शकते, यावर विश्‍वास बसत नाही. आपण शिवरायांचे वंशज आहोत, शिवरायांनी सर्व जाती धर्मांतील लोकांना सोबत घेतले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालावे, अथवा उद्रेक झाला तर आपण जबाबदार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संतोष यांनी सर्व समाजासाठी काम केले.

दलित लोकांवरील अन्यायाच्या विरोधातच तो लढल्याने त्याचा खून झाला. या प्रकरणाला जातीय रंग नको, याचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली जावी. जिल्ह्यातील आमदारांनी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरावा, असे आवाहन करतानाच या प्रकरणाचा तपास होईपर्यंत संबंधित नेत्याला अजित पवारांनी मंत्रीपद देऊ नये, असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT