Marathwada Assembly Election : ईव्हीएमवर भरवसा नाय काय ? मराठवाड्यातून फेरमतमोजणीसाठी नऊ जणांचे अर्ज

Nine applications from Marathwada for recount : यात सर्वाधिक उमेदवार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. याशिवाय जालना, परभणी, धाराशिव जिल्ह्यातूनही काहींनी अर्ज दाखल केले.
EVM Hacking News
EVM Hacking NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत महायुतीने मराठवाड्यातील 46 पैकी 41 जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या महायुतीने केलेल्या या कमबॅकमुळे महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला. निवडणुक काळात प्रचार सभा, दौरे, पदयात्रा, बैठकांना मिळालेला प्रतिसाद आणि प्रत्यक्ष मतदानातून बाहेर आलेले चित्र हे विरोधाभास दर्शवणारे ठरले.

चार महिन्यात महायुतीला एवढे मोठे यश कसे मिळाले? असा प्रश्न उपस्थित करत ईव्हीएमवर शंका घेतल्या जात आहेत. राज्य आणि देशपातळीवर ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असा दावा करत बॅलेटवर निवडणुका घेतल्या जाव्यात यासाठी चळवळ उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (EVM Machine) या पार्श्वभूमीवर इकडे मराठवाड्यात ईव्हीएमवर अविश्वास दाखवत महाविकास आघाडीच्या नऊ पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजीणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

EVM Hacking News
EVM Controversy : जगभरात EVM वर कोणत्या देशात आहे बंदी; जाणून घ्या!

यात सर्वाधिक उमेदवार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. याशिवाय जालना, परभणी, धाराशिव जिल्ह्यातूनही काहींनी अर्ज दाखल केले. (Marathwada) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार राजू शिंदे, मध्यचे बाळासाहेब थोरात, याच मतदार संघातील एमआयएमचे नासेर सिद्दीकी तर ग्रामीणमधून वैजापूर मतदार संघातील पराभूत उमेदवार दिनेश परदेशी यांचा समावेश आहे.

EVM Hacking News
PM Modi on Marathwada : 'मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणारे सरकार हवे, की पाण्याच्या थेंबाला तरसवणारे काँग्रेस आघाडीचे?' ; मोदींचा सवाल!

जालना जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे घनसावंगी मतदारसंघातील पराभूत उमेदवार माजीमंत्री राजेश टोपे, तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार विजय भांबळे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम-परांडा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे, वंचित आघाडीचे प्रवीण रणबागुल, तुळजापूर मतदार संघातील काँग्रेसचे धीरज पाटील यांचेही फेरमतमोजणीसाठी अर्ज आहेत.

EVM Hacking News
EVM Recounting : 'ईव्हीएम' फेरमतमोजणीसाठी किती खर्च येतो, ही प्रक्रिया नेमकी कशी असते?

बीड,लातूर, नांदेड,हिंगोली जिल्ह्यातून मात्र एकही फेरमतमोजणीचा अर्ज नसल्याची माहिती आहे. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे, तर भाजप नेत्यांकडून ईव्हीएम मशीन हॅक होत असेल तर जाहिररित्या करून दाखवा, असे आवाहन विरोधकांना दिले जात आहे. ईव्हीएमवर अविश्वास दाखवत अर्ज केलेल्या वरील उमेदवारांच्या निकालात फेरमतमोजणीतून काही बदल होतो का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com