Sameer Sattar Abdul Sattar sarkarnama
मराठवाडा

Sattar Politics : विधान परिषदेतून माघार, जिल्हा बँकेत एंट्री! सत्तारांची नवी राजकीय खेळी; म्हणाले, 'सहज निवडून...'

MLC Election Sameer Abdul Sattar : आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी माघार घे, भविष्यात निश्चितच तुझा विचार करू, असा शब्द दिल्याचे समीर सत्तार यांनी सांगीतले. मी पक्षाचे ऐकले आहे, असे समीर सत्तार यांनी सांगितले.

Jagdish Pansare

Shivsena News : आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपूत्र समीर सत्तार यांनी जालना- छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून अखेर माघार घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानूसार आपण माघार घेतली आहे. पण पक्षाने निवडणूक लढवू दिली असतील तर माझा विजय निश्चित होता, असा दावा समीर सत्तार यांनी केला. सर्वपक्षीय नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी मला फोन करून पाठिंबा दर्शवला होता.

आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी माघार घे, भविष्यात निश्चितच तुझा विचार करू, असा शब्द दिल्याचे समीर सत्तार यांनी सांगीतले. मी पक्षाचे ऐकले आहे, त्यामुळे पक्षही मला कुठली ना कुठली जबाबदारी देईल, असा मला विश्वास आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठीचा अर्ज मी सकाळीच दाखल केला असल्याचेही समीर सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले. त्यामुळे विधान परिषदेमधून माघार घेत जिल्हा बँकेत एंट्री फिक्स केल्याची देखील चर्चा आहे.

महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपाकडून पक्ष संपवण्याचे सुरू असलेले प्रयत्न, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून निधी वाटपात होणार अन्याय यासह इतर अनेक मुद्यांवरून अब्दुल सत्तार कमालीचे नाराज होते. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील त्यांच्या सत्तेलाही सुरूंग लावण्याच्या हालचाली भाजपाकडून सुरू झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी विधान परिषद निवडणुकीत बंडाचे निशाण फडकावले होते. त्यांची ही दबावतंत्राची रणनीती अखेर यशस्वी ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांना भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, जिल्हा बँकेत त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असा शब्द सत्तार यांना देण्यात आला आहे. त्यानंतरच त्यांनी मुलाची विधान परिषदेतील उमेदवारी मागे घेतली.

विजयाचे गणित जुळले असते..

दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर समीर सत्तार यांनी राजकीय विजय झाल्याच्या थाटात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पक्षाने परवानगी दिली असतील तर जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माझा विजय पक्का होता. विजयसाठीची सगळी गणित आम्ही जुळवली होती. जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधून तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हालाच मतदान करू, असे सांगीतले होते. परंतु पक्षाच्या आदेशामुळे माघार घेत असल्याचे समीर सत्तार यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT