Pune MLC Election : दिलीप वळसे पाटील-शरद पवार भेटीनंतर सूत्र फिरली, पुण्याच्या मैदानातून महाविकास आघाडीची माघार

Shrikant Patil Sunetra Pawar NCP sharad Pawar : सुनील टिंगरे, प्रदीप कंद यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतली आहे.
Political leaders during the Pune MLC election process as Shrikant Patil's withdrawal reshapes the electoral contest involving Sunetra Pawar and NCP leaders.
Political leaders during the Pune MLC election process as Shrikant Patil's withdrawal reshapes the electoral contest involving Sunetra Pawar and NCP leaders.sarkarnama
Published on
Updated on

Shrikant Patil News : पुणे विधान परिषद निवडणुकीतून सुनील टिंगरे आणि प्रदीप कंद यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार काय करणार याची चर्चा होती. अखेरच्या क्षणी श्रीकांत पाटील यांनी मोठा निर्णय घेत ही निवडणूक बिनविरोध करत असल्याची चर्चा आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोचत असून त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्ज मागे घेण्याच्या मुदत संपण्याच्या काही मिनीटे आधी पोहोचत त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

काल दिलीप वळसे पाटील शरद पवारांना भेटले होते. त्यावेळी या विषयी चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. आपली उमेदवारी मागे घेण्याबाबत बोलताना श्रीकांत पाटील यांनी पक्षाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. "पक्षाने आणि ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशाचा आदर करूनच मी या निवडणुकीतून माघार घेत आहे," असे पाटील यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पुणे मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे बहुमत आहे. त्यानंतर भाजपकडे मोठे संख्याबळ आहे. मात्र, हे दोन्ही पक्ष एकत्र असल्याने ही निवडणूक विरोधकांसाठी सोपी नव्हती. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती. त्यानंतर येथून श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.

Political leaders during the Pune MLC election process as Shrikant Patil's withdrawal reshapes the electoral contest involving Sunetra Pawar and NCP leaders.
Pune MLC Election : भाजपनी वाढवली होती राष्ट्रवादीची धाकधूक, शेवटच्या क्षणी सुत्रं फिरली अन् कंद यांची माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

श्रीकांत पाटील यांचे निवेदन

अर्ज मागे घेण्याचे निश्चित झाल्यानंतर श्रीकांत पाटील यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये, लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे आणि निवडणूक प्रक्रियेची पवित्रता अबाधित राहावी या व्यापक भूमिकेतून पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई अजित पवार यांच्या विनंतीला मान देत आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या निवडणुकीतून माघार घेत आहोत.लोकशाही प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास असून, राजकारणात मूल्याधिष्ठित भूमिका कायम ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील.

Political leaders during the Pune MLC election process as Shrikant Patil's withdrawal reshapes the electoral contest involving Sunetra Pawar and NCP leaders.
Nanded MLC election: "राजकारणात काहीही अशक्य नाही": श्रीकांत शिंदेंच्या गुप्त भेटीनंतर चिखलीकरांचा सूचक इशारा; भाजपविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com