MLC Election 2026 : महायुतीच्या सुहास शिरसाट यांचा मार्ग मोकळा, समीर सत्तार यांची निवडणुकीतून माघार!

MLC Election 2026 मध्ये मोठी घडामोड. समीर सत्तार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
Suhas Shirsat
Suhas ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Jalna-Chhatrapati Sambhajinagar : शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नाराजी नाट्यावर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्यावर झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर पडदा पडला. त्यानंतर आज जालना-छत्रपती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या समीर अब्दुल सत्तार यांनी माघारीची मुदत संपण्याच्या एकतास आधी अर्ज मागे घेतला. या माघारीमुळे महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाविकास आघाडीच्या अॅड. देवयानी डोणगांवकर विरुद्ध महायुतीचे सुहास शिरसाठ यांच्यात आता थेट लढत होणार आहे. समीर सत्तार यांनी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. या माघारीसाठी काल मुंबईत बऱ्याच राजकीय घडामोडी, नाट्य घडले. आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपा टप्प्या टप्पयाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदारांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप केला होता.

Suhas Shirsat
Satej Patil on Gokul Dudh sangh : गोकुळमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! अपात्र दूध संस्था प्रकरणात सतेज पाटील गट हायकोर्टात; निवडणूक पुन्हा लांबणीवर पडणार?

शिवसेना संपवण्याचे कारस्थान जिल्ह्यातील भाजपाचे नेते आमच्याच पालकमंत्र्यांना हाताशी धरून करत असल्याचा खळबळजनक आरोप सत्तार यांनी केला होता. सध्या भाजपाचे टार्गेट मी आणि वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे आहोत. पुढे संजना जाधव व इतर आमदार असे टप्प्याटप्प्याने भाजपा आमच्या लोकांना लक्ष्य करत असल्याचे सत्तार यांनी म्हटले होते.

दरम्यान, औरंगाबा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्ता आणि वर्चस्व यातून अब्दुल सत्तार यांनी बंडखोरीचे दबावतंत्र वापरले होते, असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रियेतही जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा विषय सत्तार यांच्याकडून उपस्थित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्रच लढणार आहे, सत्तार यांना स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्यास सांगितल्याचे शिंदे म्हणाले होते.

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठीच्या तडजोडीच्या राजकारणातूनच समीर सत्तार यांनी आज विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्याचे बोलले जाते. इकडे समीर सत्तार अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या संपर्क कार्यालयात चर्चा करत बसले होते. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा बँकेतील महायुतीच्या पॅनल संदर्भात भाजपाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी संदीपान भुमरे यांच्यावर सोपवल्याचे समजते.

Suhas Shirsat
Karan Sasane : भाजपची चिंता दूर, करण ससाणेंनी घेतली माघार; प्राजक्त तनपुरेंचा विजय पक्का!

जिल्हा बँकेमध्ये अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे हे संचालक होते. त्यांना बँकेतील कारभाराचा दांडगा अनुभव आहे. भाजपाने जिल्हा बँकेची सत्ता मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मंत्री अतुल सावे यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आता महायुती जिल्हा बँकेसाठी एकत्रित पॅनल देणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com