Sandipan Bhumre Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre meet Manoj Jarange: संदीपान भुमरेंकडून छत्रपती संभाजीनगरात मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचं स्वागत, अन् म्हणाले...

Sandipan Bhumre welcomes Manoj Jarange in Chhatrapati Sambhaji Nagar : खासदार भुमरे यांचा आज वाढदिवस असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांची झालेली भेट विशेष असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठवाड्यातील महायुतीचे एकमेव खासदार संदीपान भुमरे शनिवारी मनोज जरांगे पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर या आपल्या मतदारसंघातील शांतता रॅलीत सहभागी झाले. मनोज जरांगे पाटील यांचे पुष्पहार घालून स्वागत करत मराठा आरक्षणासाठी आपण कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही भुमरे यांनी जरांगे पाटील यांच्या भेटीत दिली.

विशेष म्हणजे खासदार भुमरे यांचा आज वाढदिवस असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांची झालेली भेट विशेष असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षण, सगेसोयरे यासह इतर विषयावर चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महाविका आघाडीचे आमदार, नेते गैरहजर राहिले होते. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

त्यामुळे मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील यांच्या मराठवाड्यातील जनजागृती शातंता रॅलीपासून राजकीय पक्षाचे नेते, आमदार, मंत्री अंतर राखून होते. संदीपान भुमरे यांनी मात्र मनोज जरांगे पाटील यांची काही मिनिटांसाठी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

'मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे आज काढण्यात आलेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली निमित्त भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. मराठा आरक्षणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका राहिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास्थळी भेट देऊन वेळोवेळी त्यांच्या समवेत आपण चर्चा देखील केली आहे. येणाऱ्या काळात मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळेल.' अशी प्रतिक्रिया देत, संदीपान भुमेरे(Sandipan Bhumre) यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात एकमेव छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचे संदीपान भुमरे हे विजयी झाले. उर्वरित सात मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या विरोधात असलेला रोष मराठा समाजाने ईव्हीएम मशीन मधून दाखवून दिला होता. संदीपान भुमरे यांच्या बाबतीत मात्र संभाजीनगरात मराठा समाजाने वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा होती.

भुमरे यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांचा तब्बल 1 लाख 35 हजार मताधिक्यांनी पराभव केला होता. तर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली चर्चेसाठी आलेल्या शिष्टमंडळाला एक महिन्याची मुदतवाढ दिली होती.

आज 13 जुलै रोजी ती संपत आहे. दरम्यान, मराठवाड्यात जरांगे पाटील यांनी काढलेल्या शांतता संवाद रॅलीचा समारोप आज संभाजीनगरात होत आहे. पाच तास उशीरा रॅलीला सुरूवात झाल्यानंतरही प्रचंड संख्येने मराठा समाज बांधव या रॅलीत सहभागी झाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT