Beed Poltics News : आमदार संदीप क्षीरसागरांवर शिवसेना जिल्हाप्रमुख मुळूकांचे गंभीर आरोप

Shivsena VS. Ncp News : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या आरोप-प्रत्यारोपामुळे गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Sandip Kshirsagar, Sachin Muluk
Sandip Kshirsagar, Sachin Muluk Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या आरोप-प्रत्यारोपामुळे गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी गंभीर आरोप केले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) स्वत: तर विकास कामे करु शकत नाहीत. मात्र, आणलेली विकास कामे अडवायची, प्रत्येक कार्यालयांत तक्रारी द्यायच्या आणि टक्केवारी घ्यायची, असे आमदारांचे प्रताप असल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केला. आमदारांना वेसन घालू असा इशाराही त्यांनी दिला. (Beed Poltics News)

बीड शहराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करुन विविध आठ रस्ते व नाली बांधकामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करुन आणला. शहरातील समस्या सुटाव्यात, नागरिकांना मुलभूत विकास सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, स्वत: कामे करायची नाहीत आणि इतरांनी आणलेली विकास कामे आडवायची असे आमदारांचे काम असल्यचा आरोप सचिन मुळूक यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, संतोष जाधव, सुनील सुरवसे, नंदू पिंगळे, अशोक जाधव उपस्थित होते. संदीप क्षीरसागर यांनी आमदार झाल्यापासून बीड शहर व मतदारसंघात विकास कामे केल्याचा आव आणला आहे. वास्तविक पाहता टक्केवारी घेतल्याशिवाय ते काेणतेच काम करत नसल्याचा आरोप करण्यात आला.

Sandip Kshirsagar, Sachin Muluk
Devendra Fadnavis News : 'या' अभूतपूर्व प्रकल्पांसाठी पीएम मोदींचं नाव इतिहासात लिहिलं जाईल; फडणवीसांचं मोठं विधान

बीड शहरातील झालेली रस्त्यांची दुरावस्था, अस्वच्छता, दुर्गंधी ही आमदार क्षीरसागरांनी केलेल्या विकासकामांची प्रचिती असून याचा परिणाम म्हणून साथरोगाने सर्व हॉस्पिटल हाऊसफुल होत आहेत. आमदाराच्या या कृत्यावर इतर क्षीरसागर काहीच बोलत नाहीत. कुठल्याही कामांत खोडा आणि कार्यालयांत तक्रारी येवढेच काम आमदार क्षीरसागर करत असताना दुसरे क्षीरसागर काही बोलत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

क्षीरसागरांनी पालिकेची अनेक वर्षे सत्ता भोगली. शहरात घाणीचे साम्राज्य असून गोरगरिब शेकडो नागरिकांना आजार होण्यालाही क्षीरसागरच कारणीभूत आहेत. स्मशानभूमीची जागा हडपण्याचा प्रयत्न सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही प्रशासन गुन्हे नोंद करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Sandip Kshirsagar, Sachin Muluk
Sakal Election 2024 Survey News: विधानसभा निवडणुकीत मतदारांची 'या' पक्षाला सर्वाधिक पसंती ? मोठ्या सर्व्हेतून आले समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com