Sanjay Bansode, Vilasrao Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Bansode Latur : नाराज संजय बनसोडेंना विलासराव देशमुखांची आठवण; काय आहे कारण ?

Vilasrao Deshmukh : "विलासराव देशमुखांनी दिलेल्या विकासाच्या विचारानेच आम्ही चालतो"

सरकारनामा ब्यूरो

Latur News : दूरदृष्टी, वेळत कुठलेही मोठे काम तडीस नेण्याची हातोटी या क्षमता आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची आठवण येते. विकासाचा लातूर पॅटर्न राबवलेल्या विलासरावा देशमुखांनी बाजार समितीत स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहाची उभारणी केली. याच सभागृहाची दुरवस्था झाल्याने मंत्री संजय बनसोडेंनी खंत व्यक्त केली. विलासराव देशमुखांच्या कामांच्या आठवणींना उजाळा देत बनसोडेंनी सभागृहाकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत नाराजीही व्यक्त केली. (Latest Political News)

काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांनी एका कार्यक्रमाचे आयोजन लातूर बाजार समितीच्या सभागृहात केले होते. त्यास क्रीडामंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विलास देखमुखांनी सुरू केलेल्या लातूर पॅटर्नबाबत माहिती दिली. बनसोडे म्हणाले, "आशिया खंडात पहिल्या दहामध्ये लातूर बाजार समितीचा समावेश आहे. या बाजार समितीच्या वतीने उभारलेल्या स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहाची दुरवस्था झाली आहे."

"माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी जिल्ह्यात विकासाचा लातूर पॅटर्नची निर्मिती केली. साहेबांनी उभारलेल्या या सभागृहाची झालेली दुरवस्था पाहून मला वाईट वाटले. त्यांची विकासासाठी दृष्टी आणि विचारानेच आजही आम्ही चालतो. आशियाखंडात लौकिक असलेल्या बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे", अशा सूचनाही बनसोडेंनी यावेळी केल्या.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या वडिलांच्या नावे वीस वर्षापूर्वी सभागृह लातूर बाजार समिती आवारात उभारण्यात आले होते. लातूर शहरात नाट्यगृहाच्या जागेबाबत वाद निर्माण झाला होता, तेव्हाही हे सभागृह दिमाखात सांस्कृतिक सेवा देत राहिले. त्याची दुरवस्था शहरातील नाट्यरसिकांना अस्वस्थ करणारी आहे.

त्यावर काही महिन्यात राजकीय वर्तुळात चर्चाही सुरु होती, पण उघड कोणी बोलत नव्हते. मात्र एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या आणि विकासासाठी आग्रही असलेल्या क्रीडामंत्री बनसोडेंनी सभागृहाबाबत जाहीर वक्तव्य करून वाचा फोडली. यानंतर शहरातही याबाबत आता उघडउघड चर्चा होऊ लागली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT