Uddhav Thackeray-Sanjay Raut Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT : मातोश्रीची साथ सोडणाऱ्या शिवसेना खासदाराचा मोठा गौप्यस्फोट : संजय राऊत अन्‌ उद्धव ठाकरेंचेच पटत नाही...

Sanjay Raut-Uddhav Thackeray News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदार बंडू जाधव यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याचा दावा करत नवे राजकीय आरोप केले.

Vijaykumar Dudhale

Parbahani, 28 June : खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचंच पटत नाही. फक्त ते पुढे बोलत नाहीत. पण उद्धव ठाकरे यांना नुकसान कसं पोचलं, एवढंच काम ते करतात, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी केला आहे.

पाथरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे, त्याच्या उद्‌घाटनानंतर खासदार जाधव बोलत होते. या वेळी आमदार सईद खान आणि पाथरीचे नगराध्यक्ष असिफ खान उपस्थित होते.

ते म्हणाले, संजय राऊतसाहेब तुमच्या घरी कधी मी पाणी तरी प्यायलो आहे का. ‘सामना’च्या कार्यालयात बसून एक-दोनदा तुम्हीच पिवळं पाणी पित होता. तुमच्या मायच्या इमानदारीनं... तुमच्या लेकराची शपथ घेऊन सांग म्हणावं. मी माझ्या लेकरांची शपथ घेऊन सांगतो की मी कधी बाटलो नाही आणि बाटणारही नाही.

संजय राऊत, तुम्ही असं दुसऱ्याबाबत खोटंनाटं कशाला सांगता. त्या ठिकाणी बदामाची भरणी होती, बाजूला वेफर्स होते. मी दिवसभर उपाशी होतो, त्यामुळे मी ते बदाम काढून खात होतो. ते फोटो आजही उपलब्ध आहेत, तुम्ही पाहू शकता, असेही खासदार जाधव यांनी विमानातील व्हायरल फोटोबाबत स्पष्ट केले.

ते म्हणाले, बरं विमानात दारू, सिगारेट, बिडी, नेता येते का? हे त्यांना माहिती नाही का? ते विमानाने प्रवास करत नाहीत का. का बैलगाडीनं प्रवास करतात. पण संजय राउत यांच्याइतका बेईमानच कोणी नाही. उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवायला संजय राऊत हेच कारणीभूत आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT