Rajesh Kshirsagar : व्हायरल व्हिडिओवर आमदार क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण; सतेज पाटलांवर गंभीर आरोप करत म्हणाले, "व्हॉईस डबिंग अन् जाणीवपूर्वक..."

Rajesh Kshirsagar video controversy : "मी पाठीत वार करणारा माणूस नाही आणि सतेज पाटलांनीही आता पाठीत वार करणे बंद करावे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हा एडिटेड व्हिडीओ व्हायरल करून पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती."
MLA Rajesh Kshirsagar, Satej Patil
MLA Rajesh Kshirsagar addresses a press conference in Kolhapur, responding to allegations and speaking on the edited video controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 28 Jun : "आमदार सतेज पाटील यांनी माझ्यावर निरर्थक आणि बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा, त्यांनी स्वतः इतकी वर्षे महापालिकेत सत्ता आणि पालकमंत्री पद भोगताना कोल्हापूरच्या जनतेसाठी काय दिवे लावले, याचे विश्लेषण करावे.

राजकीय अस्तित्व संपत आल्यामुळे आणि महापालिका निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाच्या धक्क्यातून ते अजूनही बाहेर न आल्यामुळेच, ते माझ्याविरोधात बदनामीचे छुपे षडयंत्र रचत आहेत," असा घणाघाती आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेतून केला.

'तो' व्हिडीओ एडिटेड

कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका कथित व्हिडीओबाबत बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, "माझ्या नावावर जो व्हिडीओ प्रसारित केला जात आहे, तो पूर्णपणे व्हॉईस डबिंग करून आणि जाणीवपूर्वक एडिट करून तयार करण्यात आला आहे.

तरी नशीब त्यात मी कोणत्याही प्रकारची दादागिरी, निगेटिव्हिटी किंवा ब्लॅकमेलिंग केलेले दाखवलेले नाही. मुळात तो कोणताही शासकीय व्यवहार नव्हता. ज्या व्यक्तीने गैरसमजातून तो व्हिडीओ बनवला होता, त्याने नंतर माझी प्रत्यक्ष भेट घेतली. त्याची अडचण समजून घेऊन मी त्याला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.

सदर व्हिडीओ यापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी 14 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत प्रसारित केला होता. यानंतर 15 जून 2026 रोजी त्या व्यक्तीने स्वतःहून माझ्याशी संपर्क साधला आणि या व्हिडीओचा गैरवापर केला जात असल्याचे तसेच ‘या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही’ असे मला लेखी लिहून दिले आहे. माझ्याकडे सर्व कायदेशीर आणि ठोस पुरावे उपलब्ध असून, योग्य वेळ आल्यावर हे सर्व पुरावे मी जनतेच्या दरबारात सादर करेन."

MLA Rajesh Kshirsagar, Satej Patil
TET paper leak : "TET पेपर फुटीचं ठाणे कनेक्शन, कोणाचा तरी फडणवीसांच्या पदावर डोळा..." खडसेंचा थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा?

तर सतेज पाटलांच्या पायाखालची वाळू सरकली!

सतेज पाटलांवर निशाणा साधताना आमदार क्षीरसागर म्हणाले, "मी पाठीत वार करणारा माणूस नाही आणि सतेज पाटलांनीही आता पाठीत वार करणे बंद करावे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हा एडिटेड व्हिडीओ व्हायरल करून पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती आणि तसे ई-मेलही पाठवले होते. मग आज इतके दिवस झाले, तरी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी याची चौकशी केली का? याची माहिती घेण्यासाठी सतेज पाटलांना आजपर्यंत वेळ मिळाला नाही का? की आजही ते महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दिलेल्या पराभवाच्या धक्क्यातून आणि धसक्यातून बाहेर आलेले नाहीत?"

ते पुढे म्हणाले, "दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले राजकीय स्वार्थ साधण्याची सतेज पाटलांची जुनी सवय आहे. हा सगळा प्रकार म्हणजे केवळ माझी राजकीय आणि सामाजिक बदनामी करण्याचा एक पूर्वनियोजित कट आहे आणि मी याचा तीव्र शब्दांत निषेध करतो."

MLA Rajesh Kshirsagar, Satej Patil
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'मधील जवांनाच्या बलिदानाची माहिती लपवल्याचे आरोप खोटे; 6 जवानांबाबतची 'ती' बातमी चुकीची; संरक्षण मंत्रालयाचे स्पष्टीकरण

जनतेने काँग्रेसला नाकारले

सतेज पाटील यांच्या घसरत्या राजकीय आलेखावर बोट ठेवत आमदार क्षीरसागर म्हणाले, "सतेज पाटील राजकारणाच्या मर्यादा विसरल्यामुळेच कोल्हापूरच्या सुजाण जनतेने विधानसभा निवडणुकीत त्यांचा १०-० असा दारूण पराभव केला. एवढेच नव्हे, तर नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्येही जनतेने काँग्रेसला नाकारून महायुतीला स्पष्ट बहुमत आणि सत्ता दिली आहे.

आता त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकली असून, आगामी काळात 'गोकुळ' दूध संघाची सत्ताही महायुतीच खेचून आणणार आहे. या पराभवाच्या भीतीपोटीच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते असे केविलवाणे आरोप करत आहेत, असंही आमदार क्षिरसागर यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com