Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Politics : मोदी-शहांचा राज योग संपला; दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत असल्याचा ठाकरे सेनेच्या बड्या नेत्याचा दावा!

Sanjay Raut predicts major political development News : ज्ञानेशकुमार भाजपला मते मिळवून देतात, असा आरोप राऊत यांनी केला. प्रत्येक राज्यात मतदारांची नावे वगळली जात आहेत. महाराष्ट्रात दोन कोटी नावे वगळली. हे आता चालणार नाही.

Jagdish Pansare

Chhatrapti Sambhajinagar News : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जनतेला एका मताची मोठी ताकद दिली आहे. याच मताच्या बळावर जनता सत्ता देते आणि सत्तेतून खालीही खेचते. आता आपला लढा अंतिम टप्प्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजयोग संपला आहे. आगामी दीड महिन्यात दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघाच्या अधिवेशनासाठी राऊत आले होते. गेल्या 12 वर्षात देशातील एकही घटक समाधानी नाही. प्रत्येक जण रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे. असे असताना भाजपला मते मिळतात कशी? असा प्रश्‍न आहे. ज्ञानेशकुमार भाजपला (BJP) मते मिळवून देतात, असा आरोप राऊत यांनी केला. प्रत्येक राज्यात मतदारांची नावे वगळली जात आहेत. महाराष्ट्रात दोन कोटी नावे वगळली. हे आता चालणार नाही.

संविधानाची प्रत हाती घेऊन अभिजित दिपके यांच्यासह तरुण दिल्लीत जंतरमंतरवर उतरले आणि मोदी-शहांच्या सत्तेला त्यांनी हादरा दिला. केंद्रात पहिल्यांदाच एका मंत्र्याचा राजीनामा झाला. आता लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. दीड महिन्यात दिल्लीत मोठ्या घडामोडी घडतील, मोदी-शहांना जेलमध्ये जावे लागेल, हे देखील त्यांना कळून चुकले आहे. सत्ता वाचविण्यासाठी दोघे काहीही निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे तुम्हा-आम्हाला सावध व्हावे लागेल, असे आवाहन राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

वर्षा बंगला, मंत्रालयात बसलेले वामन

मराठवाड्यातील दुष्काळावरून राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. हे राज्य बळीचे आहे आणि शेतकरी संकटात असताना वामन हा वर्षा बंगल्यात बसला आहे. मंत्रालयात बसलेले सर्व मंत्री वामन आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ४० हजार कोटी रुपयांची गरज आहे, राज्याकडे केवळ पाच हजार कोटी आहेत. केंद्राकडे १० हजार कोटीची मागणी करण्यात आली होती. मिळाले फक्त १ हजार कोटी, हा निधी देखील टप्प्याटप्प्यात मिळणार आहे, मग शेतकरी सुखी कसा होइल? असा प्रश्‍न राऊत यांनी केला. राज्याने जाहीर केलेली ५ हजारांची मदत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही, असा आरोप राऊत यांंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT