

Parbhani Politics : शिवसेनेचे आमदार सईद खान यांनी सोमवारी मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक स्वीकृत सदस्यांचा पक्षप्रवेश घडवून आणल्याचा दावा केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा घडवून आणत सईद खान यांनी याची छायाचित्रे नावासह आपल्या अधिकृत सोशल मिडिया पेजवरून व्हायरल केले होते. त्यानंतर आज पाथरी तालुक्यात एकच खळबळ उडाली.
सईद खान यांनी दावा केलेले पदाधिकारी हे नगरसेवक नाहीत तर एक त्यांचा पती आणि दुसरा मुलगा असल्याचा खुलासा काँग्रेसचे नेते तारेख दुर्राणी यांनी पत्रकार परिषद घेत केला. काँग्रेसच्या दोन्ही नगरसेविका या आमच्यासोबतच आहे, त्या कुठेही गेलेल्या नाहीत, कुणीही फुटून गेलेले नाही, असे दुर्राणी यांनी स्पष्ट केले. आमदार सईद खान यांनी त्यांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे यांचीही दिशाभूल केली.
काँग्रेसचे नगरसेवक कुठेही गेलेले नाहीत, उलट त्यांचेच आणखी तीन नगरसेवक थोड्याच दिवसात राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही तारेख दुर्राणी यांनी माध्यमांशी बोलताना केला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडल्याचा दावा शिवसेनेचे आमदार करत आहेत, पण ते लोकांची दिशाभूल करून संभ्रम पसरवत आहेत. फोडणे कशाला म्हणतात, हे आमचे मित्र राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी दाखवून दिले आहे.
शिवसेनेचे दोन नगरसेवक राजीनामा देऊन गेले आहेत, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला आहे. ते आता परत येऊ शकतात का? आमचे नगरसेवक आमच्या सोबत आहेत, गेले ते त्यांच्या घरातील लोक आहेत. सध्या राजकारणात एका घरातील चार लोक वेगवेगळ्या पक्षात असतात, त्यामुळे नगरसेविकांचे पती, मुलगा पक्ष सोडून गेला म्हणजे नगरसेवक फोडले असा दावा करणे म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.
नगरसेवक फोडणे कशाला म्हणतात? हे राजेश विटेकर साहेबांनी दाखवून दिले आहे. शिवसेनेचे दोन नगरसेवक राष्ट्रवादीत गेले आता काँग्रेसमध्येही लवकरच शिवसेनेचे तीन नगरसेवक आलेले तुम्हाला दिसतील, वाट पहा, असा सूचक इशाराही तारेख खान यांनी दिला आहे. आमच्या दोन्ही नगरसेविका कुठेही गेलेल्या नाहीत. त्या आजही आमच्या सोबत खंबीरपणे उभ्या आहेत.
विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या अफवांवर आणि दिशाभूल करणाऱ्या विधानांवर विश्वास ठेवू नका. आमची एकजूट कायम आहे, आमची साथ कायम आहे आणि आमची भूमिका ठाम आहे. अफवांवर नाही, तर सत्यावर विश्वास ठेवा. एकजूट आमची ताकद आहे आणि सत्य आमची ओळख, असेही तारेख दुर्राणी यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.